शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘गंगापूर’मध्नच वाढीव पाणी आरक्षणाचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:14 IST

नाशिक : यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षासाठी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविलेली आहे. दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षणापैकी सन २०१६-१७ मध्ये महापालिकेने केवळ ३०२ दलघफू पाणी उचलल्याने यंदा ३०० दलघफू पाणी आरक्षणाचीच मागणी करण्यात आलेली आहे. गुरुवारी (दि.२) जिल्हाधिकाºयांकडे होणाºया पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत दारणातील पाणी आरक्षण कमी करून ते गंगापूर धरणातून वाढवून देण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.

नाशिक : यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षासाठी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविलेली आहे. दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षणापैकी सन २०१६-१७ मध्ये महापालिकेने केवळ ३०२ दलघफू पाणी उचलल्याने यंदा ३०० दलघफू पाणी आरक्षणाचीच मागणी करण्यात आलेली आहे. गुरुवारी (दि.२) जिल्हाधिकाºयांकडे होणाºया पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत दारणातील पाणी आरक्षण कमी करून ते गंगापूर धरणातून वाढवून देण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.महापालिकेने गेल्या वर्षी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूरमधून ४२०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती परंतु, जलसंपदा खात्याने गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती. महापालिकेने २९० दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाण्याचा पूर्णपणे वापर केला होता. तर दारणा धरणातून ४०० पैकी ३०२ दलघफू इतकीच पाण्याची उचल करण्यात आली होती.गंगापूर धरण समूहात ९९ टक्के साठाशहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ३० आॅक्टोबर २०१७ अखेर ५५०० दलघफू म्हणजे ९८ टक्के पाणीसाठा झालेला आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणात १८४१ दलघफू (९९ टक्के), गौतमी गोदावरी १८५६ दलघफू (९९ टक्के) तर आळंदी धरणात ९७० दलघफू (१०० टक्के) पाणीसाठा आहे. गंगापूर धरण समूहात एकूण १०१६७ दलघफू (९९ टक्के) पाणीसाठा आहे तर दारणा धरणात ७१४९ दलघफू म्हणजे शंभर टक्के पाणीसाठा आहे. दारणा धरणातील पाणी उचलण्यास येणाºया मर्यादा लक्षात घेता दारणातील वाढीव पाणी आरक्षणाचा महापालिकेला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे गंगापूरमधूनच पाणी आरक्षण वाढविण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.दारणातील आरक्षण कमी करण्याची मागणी महापालिका दारणा धरणातून नाशिकरोड भागासाठी पाण्याची उचल करत असते परंतु, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता दारणा धरणातून ३०० दलघफूच्या वर पाण्याची उचल करता येत नाही. तांत्रिकदृष्ट्या पाणी उचल करण्यात अडचणी येत असल्याने दारणातील पाणी आरक्षण कमी करण्याची मागणी महापालिकेने यापूर्वी वारंवार जलसंपदा विभागाकडे केलेली आहे.१ सन २०१५ पर्यंत महापालिकेला दारणा धरणातून ५०० दलघफू पाणी आरक्षण मिळत आले आहे. परंतु, सन २०१५-१६ मध्ये पाणीप्रश्न पेटल्यानंतर जलसंपदा विभागाने दारणातील पाणी आरक्षण १०० दलघफूने घटवत ४०० दलघफूवर आणले होते.२ मात्र, गेल्या वर्षभरात ३०२ दलघफू पाण्याचीच उचल करणे महापालिकेला शक्य झाले. दारणातील पाणी उचलण्याची क्षमता लक्षात घेऊन महापालिकेने आता सन २०१७-१८ या वर्षासाठी दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली आहे.३ गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यंदा गंगापूर धरणासह समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने जलसंपदा विभागाकडून महापालिकेची मागणी मान्य केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.