शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू पदविका परिक्षेत शहरातील ३७ विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 21:15 IST

सारडासर्कल येथील नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात उर्दू-अरेबिक भाषांच्या पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाची अभिरूची दिवसेंदिवस बीगर उर्दू-अरेबिक भाषिक वर्गातील नागरिकांमध्येही वाढू लागली आहे.

ठळक मुद्देया दोन्ही भाषांचा निकाल १०० टक्के लागला.अभिरूची दिवसेंदिवस बीगर उर्दू-अरेबिक भाषिक वर्गात

नाशिक : शहरात मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून राबविल्या जाणाऱ्या उर्दू व अरेबिक भाषा विकास उपक्रमांतर्गत पदविका अभ्यासक्रमाची परिक्षा घेतली गेली. या दोन्ही भाषांचा निकाल १०० टक्के लागला. उर्दू अभ्यासक्रमात केटीएचएम महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. मोहन पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच अरेबिक भाषेत फरहत सय्यद यांनी प्रथम क्रमांक मिळविला.सारडासर्कल येथील नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या आवारात उर्दू-अरेबिक भाषांच्या पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाची अभिरूची दिवसेंदिवस बीगर उर्दू-अरेबिक भाषिक वर्गातील नागरिकांमध्येही वाढू लागली आहे. मागील वर्षी उर्दूमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनील कडासने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता. नवी दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन आॅफ उर्दू लॅँग्वेजकडून एप्रिल-२०१९मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत उर्दूसाठी ३७ तर अरेबिक भाषेसाठी १६ परिक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच परिक्षार्थी उत्तीर्ण झाल्याने दोन्ही भाषांच्या पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती व्यवस्थापन मंडळाचे सचिव प्रा.जाहिद शेख यांनी दिली.उर्दू भाषेच्या परिक्षेत परिक्षेत फारूख बागवान यांनी द्वितीय व शरद पगारे यांनी तृतीय क्रमांक राखला. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणधिकारी अनिल शहारे, माजी विस्तारधिकारी भिमराव गरड, रश्मी काळोखे, अ‍ॅड. आसीम शेख, गौरव देशमुख, डॉ. सतीश करंदीकर आदिंनी विशेष प्राविण्यात यश मिळविले. अरेबिक पदविका अभ्यासक्रमात राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी हसन सय्यद यांनी प्रथम तर आरीफ अब्दुल कादर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. उर्दूचे धडे जमीर पठाण व अरेबिक भाषेचे धडे मौलाना युनूस सकाफी यांनी परिक्षार्थींना दिले.

 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र