शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शहरी माओवाद घातक समस्या :  स्मिता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:07 IST

लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असल्याचे सांगणारे माओवादी हे लोकांवर लढा लादून स्वत:ची राजकीय सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे,

नाशिक : लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असल्याचे सांगणारे माओवादी हे लोकांवर लढा लादून स्वत:ची राजकीय सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. माओवाद्यांनी भारताविरुद्ध लढा उभारून त्याला ‘क्रांती’ असे नाव देत शहरी भागाची मदत मिळविण्यासाठी शहरी माओवाद पसरविण्यास सुरुवात केली, ही देशापुढील मोठी समस्या आहे, असे प्रतिपादन भारतीय सैन्याच्या कोअर आॅफ इंजिनियर्स विभागातून निवृत्त झालेल्या कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.  मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प गायकवाड यांनी बुधवारी (दि.१२) गुंफले. ‘माओवाद आणि अंतर्गत सुरक्षा’ या विषयावर बोलताना त्यांनी माओ विचारसरणीतून जन्माला आलेला नक्षलवाद, काळानुरूप बदलत गेलेली युद्धनीती व स्वरूप, जंगलात जन्मलेला नक्षलवाद व माओवाद शहरी माओवाद बनला असून, त्यांची ध्येय, उद्दिष्ट्ये यांचा चौफेर आढावा घेतला. यावेळी गायकवाड म्हणाल्या, ७०च्या दशकात कोंडापल्ली सीतारमय्या याने शहरी नक्षलवादासाठी पीपल्स फ ॉर ग्रुप ही संघटना चालविली.१९८०-९५ हा कालावधी सीतारमय्याने चांगलाच गाजविला; मात्र त्यानंतर त्याला फारसे बळ मिळाले नाही. कारण नक्षलवादी, माओवादी संघटना या विखुरलेल्या होत्या. मात्र २००१ नंतर भारत हा मोठा शत्रू मानत सुमारे ४० पेक्षा अधिक संघटना भारताविरोधी लढ्यासाठी एकत्र झाल्या. २००४ पासून त्यांच्या भारताविरोधी लढ्याला अधिकच बळ मिळत गेले. त्यांनी या लढ्याला क्रांती असे संबोधले. पारंपरिक हत्यारांचा वापर करणारे माओवादी हे २००४ नंतर सैनिकी प्रशिक्षण घेऊन आधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झाले. आताची लोकशाही ही लोकांची नाही, असे सांगून माओवाद्यांनी भारताची शासकीय यंत्रणा आणि संविधानाला उद्ध्वस्त करण्याचे अंतिम ध्येय ठेवले आहे, असे गायकवाड यांनी यावेळी अधोरेखित केले.कोरेगाव-भीमा दंगलीमागे शहरी माओवादकोरेगाव-भीमा दंगलीमागे शहरी माओवाद विचार तपासी यंत्रणांच्या माध्यमातून पुढे आला आहे. या दंगलीचे धागेदोरे पुण्याच्या शनिवारवाड्यात झालेल्या एल्गार परिषदेशी जोडलेले असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. कोरेगाव-भीमामध्ये एल्गार परिषदेने दहशत पसरविली. या परिषदेच्या आयोजनामागे असलेल्या संघटनांनी ‘आजच्या पेशवाईशी लढण्यासाठी कंबर कसा’, ‘भीमा कोरेगावने दिला धडा, नवी पेशवाई म्हसणात गाडा’ अशी टॅगलाइनची पत्रे वाटली. आंबेडकरवादी संविधानविरोधी कधीच असू शकत नाही, जे संविधानविरोधी आहेत केवळ माओवादीच, असे गायकवाड म्हणाल्या.

टॅग्स :Nashikनाशिक