शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शेती, आर्थिक मंदी विषय अस्पर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 02:07 IST

कांद्याच्या भावातील चढ-उतार त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे उद्योग क्षेत्रावर आलेले संकट या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही विषय अस्पर्शी राहिल्याने संबंधित घटकांची यामुळे निराशा झाली.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांची सभा : शेतकरी, उद्योजकांची नाराजी; सध्याचे प्रश्न टाळर्ले

नाशिक : कांद्याच्या भावातील चढ-उतार त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे उद्योग क्षेत्रावर आलेले संकट या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही विषय अस्पर्शी राहिल्याने संबंधित घटकांची यामुळे निराशा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि.१९) पंचवटीत सभा झाली. त्याकडे अनेक घटकांचे लक्ष लागून होते. मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला. त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला ड्रायपोर्टचा विषय आवर्जून मांडला. शेतकरी सन्मान योजनेवर मत मांडले, मात्र कांद्याच्या विषयाला मात्र त्यांनी हात घातला नाही.नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात अस्थिरता आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले असले तरी त्या आधी भाव सातत्याने कोसळत होते. कांद्याच्या भावाचा हा नेहमीचा प्रश्न असून, त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारादेखील दिला होता. त्यामुळे मोदी यांच्या सभेत याविषयावर ते बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यावर ते बोलले नाहीत. याशिवाय वाहन उद्योगातील मंदी, बंद पडलेले कारखाने, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयाला हात न घालता त्यांनी विविध योजना मात्र सर्व सामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा केला. एचएएल संदर्भातही त्यांनी व्यक्तव्य केले नाही.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस