शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भुषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 19:50 IST

लासलगाव : सदृढ भारत देश घडविण्याचे काम महाराष्ट्र भुषण तिर्थरु प डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सुरू असून या कार्याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे त्यांच्या प्रतिमेचे अनावरण लासलगाव ग्रामपंचायत मध्ये होत आहे ही अत्यंत गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन निफाडचे आमदार अनिल कदम यांनी केले.

ठळक मुद्देलासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम सोहळा संपन्न

लासलगाव : सदृढ भारत देश घडविण्याचे काम महाराष्ट्र भुषण तिर्थरु प डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सुरू असून या कार्याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे त्यांच्या प्रतिमेचे अनावरण लासलगाव ग्रामपंचायत मध्ये होत आहे ही अत्यंत गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन निफाडचे आमदार अनिल कदम यांनी केले.लासलगाव ग्रामपंचायत येथे मंगळवारी (दि.१६) तिर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या हस्ते व लासलगाव ग्रामपालिका चे उपसरपंच जयदत्त होळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, बाजार समितीचे संचालक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध गावचे सरपंंचच व्यासपीठावर उपस्थित होते. गेली ७५ वर्ष समाज प्रबोधन करण्याचे काम ज्यांनी केले असे तिर्थरु प डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण आपल्या हातून होत आहे हे माझे भाग्य असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले आमच्यासारखे राजकारणी हे स्वच्छता करण्यासाठी उपदेश करतात मात्र या प्रतिष्ठान यांचेकडून प्रत्यक्ष कृती केली जाते त्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी करण्याची गरज असल्याचे यावेळी कदम यांनी स्पष्ट केले. चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी देखील प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या सुरू असलेल्या कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या. लासलगाव बाजार समितीच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे भव्य प्रवेशद्वार उभारले जात असून याकरिता आप्पासाहेब किंवा सचिनदादा धर्माधिकारी यांना उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमेचे अनावरण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.