शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विठूनामाच्या गजरात रंगले अभंगगान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:13 IST

‘गोड नाम विठुबाचे...’, ‘माझे माहेर पंढरी...,’ ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...,’ ‘विसावा विठ्ठल..,’ अशा एकापेक्षा एक सरस विठुरायाचे अभंग विविध रागांमध्ये आपल्या सुमधुर आवाजात अन् बहारदार शैलित सादर करत गायक कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी अन् रंजनी-गायत्री यांनी मैफल उत्तरोत्तर खुलविली. यावेळी उपस्थित श्रोते विठुमाउलीच्या भक्तिरसात न्हाऊन निघाले.

नाशिक : ‘गोड नाम विठुबाचे...’, ‘माझे माहेर पंढरी...,’ ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...,’ ‘विसावा विठ्ठल..,’ अशा एकापेक्षा एक सरस विठुरायाचे अभंग विविध रागांमध्ये आपल्या सुमधुर आवाजात अन् बहारदार शैलित सादर करत गायक कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी अन् रंजनी-गायत्री यांनी मैफल उत्तरोत्तर खुलविली. यावेळी उपस्थित श्रोते विठुमाउलीच्या भक्तिरसात न्हाऊन निघाले.  निमित्त होते, पंचम निषाद व फ्रेण्ड््स सर्कलच्या वतीने शनिवारी (दि.२१) दादासाहेब गायकवाड सभागृहात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्या मैफलीचे. विठुनामाचा जयघोष करीत ‘जयजय रामकृष्ण हरी...’च्या गजराने मैफलीला प्रारंभ करण्यात आला. सहभागी चारही गायकवृंदांनी सामूहिकरीत्या उपस्थित वाद्यवृंदाच्या सुरेख साथीने केलेल्या विठुनामाच्या गजराने अवघ्या सभागृहात विठुरायाच्या भक्तीचा जागर केला अन् उपस्थित श्रोत्यांचा भक्तीचा उत्साह सळसळता ठेवला. विठुमाउलीच्या गजरानंतर भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय व लोकप्रिय संगीतावर विशेष पकड असलेल्यामेवुंडी यांच्या गायनाने समारोपकिराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘विसावा विठ्ठल, सुखाची सावली...’ या रचनेने त्यांच्या गायन सत्राला प्रारंभ क रताच उपस्थित भाविक विठुमाउलीच्या भक्तीत तल्लीन झाले. ‘आकार-उकार, मकार करिती हा विचार’ हा अभंग उत्स्फूर्त दाद मिळवून गेला. संत तुकारामांची रचना असलेला ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा...’ हा अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर तीर्थ विठ्ठल या अभंगाद्वारे उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मेवुंडी यांनी अशाप्रकारे विविध रचना आपल्या बहारदार शैलित सादर करत मैफलीचा समारोप केला.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी