शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने प्रचाराचे  नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:09 IST

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची  रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराचे फेरनियोजन केले जात आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. 

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची  रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराचे फेरनियोजन केले जात आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ हजार १०५ उमेदवार आपले नशीब आजमवीत आहेत. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार यंदा उमेदवारांना प्रचाराचा वेळ तसाही कमी मिळणार असल्याने, उमेदवारांनी माघारीच्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती, परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने उमेदवारांच्या मनसुब्यांवरही पाणी फिरले आहे. प्रचाराचे नियाेजन पावसामुळे कोलमडल्यामुळे कमी वेळेत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार असल्याने, उमेदवारांच्या हाती आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक राजकीय नेते, तसेच स्थानिक पुढाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आल्याने जवळपास दीड हजार प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, तर काही ठिकाणी ऐन वेळी उमेदवाराने अर्ज कायम ठेवल्याने दोन ते चार जागांसाठीच मतदान होत आहे. त्यामुळे या जागांमधील चुरशीची लढत महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकांमध्ये आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे आमदारांनीही लक्ष घातल्याने आगामी दिवसात निवडणुकीतील चुरस अधिक बघायला मिळू शकते.  येत्या १३ सारखेला सायंकाळी प्रचाराची अधिकृत सांगता होणार असून, त्यानंतर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख केली जाणार आहे. मतदानाच्या पूर्वीच्या दोन दिवसांतील घडोमोडीवर लक्ष केंद्रित करण्यासाठीचा कार्यक्रमही आखण्यात आला आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. १५ तारखेला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. प्रशासकीय तयारी पूर्णत्वाकडेप्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहे. जिल्ह्यातील एकूण १,९३३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी अंदाजे १० हजार इतके कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील २,१३२ प्रभागामंध्ये ५,८९५ जागांसाठी निवडणुकीतील चुरस वाढली आहे. यापैकी १,६२७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक