शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता बालिकेची निर्घृण हत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:10 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला या गावातून गेल्या चौदा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय बालिकेची हत्त्या झाल्याचे उघड झाले असून याबाबत संशयिताने कबुली दिली आहे.या बालिकेवर अतिप्रसंग करताना विरोध केल्याने तिच्या डोक्यात दगड घालून,गळा आवळून हत्त्या केल्याची कबुली संशयितांनी दिल्यावर पोलिसांनी आज या बालिकेचा निर्जनस्थळी पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला या गावातून गेल्या चौदा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय बालिकेची हत्त्या झाल्याचे उघड झाले असून याबाबत संशयिताने कबुली दिली आहे.या बालिकेवर अतिप्रसंग करताना विरोध केल्याने तिच्या डोक्यात दगड घालून,गळा आवळून हत्त्या केल्याची कबुली संशयितांनी दिल्यावर पोलिसांनी आज या बालिकेचा निर्जनस्थळी पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला.  आवळी दुमाला येथील किरण जमधडे ही पाच वर्षीय बालिका गेली चौदा दिवसापासून बेपत्ता झाली होती. याबाबत या बालिकेचे वडील रमेश जमधडे यांनी घोटी पोलीस ठाण्यात माझ्या मुलीचे गोपीनाथ दत्तू जमधडे या संशयित व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्र ार दिली होती.यामुळे या बालिकेला शोधण्याचे गंभीर आव्हान घोटी पोलिसांसमोर उभे राहिले होते. या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेवर सोपविली होती. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने या संशयितास शहापूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले होते.त्याची सखोल चौकशी केली असता सदर बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता तिने आरडाओरडा केल्याने तिची डोक्यात दगड घालून तसेच गळा आवळून हत्त्या केल्याची तसेच तिचा मृतदेह गावाजवळ एका निर्जनस्थळी असलेल्या नाल्यात पुरले असल्याची कबुली संशयितांनी दिली. यानुसार आज सकाळी तहसीलदार अनिल पुरे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अडसूळ, संदीप हांडगे, नवनाथ गुरूळे, शिवाजी जुंदरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.लचके यांनी संशाियतांनी दाखविलेल्या ठिकाणी शोधमोहीम राबविली. तेथे सदर बेपत्ता बलिकेच्या मृतदेहाचा सांगाडा, कपडे व बांगड्या मिळून आल्या आहेत.दरम्यान गेली चौदा दिवसापासून बेपत्ता असलेल्या बालिकेची नात्याने चुलता असलेल्या व्यक्तीनेच हत्या केल्याची घटना उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गोपीनाथ जमधडे यास जेरबंद केले आहे. दरम्यान घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक