शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

युतीतील बंडखोरीवर अखेरपर्यंत नाही उतारा

By श्याम बागुल | Updated: October 18, 2019 15:48 IST

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशा त-हेने निवडणुकीची तयारी केली होती. भाजप, सेनेत विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी राजकीय तणाव निर्माण झाल्यामुळे दोन्ही पक्षांची युती होणार नाही अशी अटकळ बांधून दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी आपापल्यापरीने मतदार संघाची चाचपणी

ठळक मुद्देदोन्ही पक्षांकडून सोयीस्कर मौन : अधिकृत उमेदवार अडचणीतजिल्ह्यातील नांदगाव, नाशिक पश्चिम, इगतपुरी या तीन मतदार संघात बंडखोरी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीत युतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष नामांकन दाखल करून बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नुसता इशारा युतीतील दोन्ही पक्षांनी दिला असला तरी, प्रत्यक्षात मतदानाची वेळ समीप आलेली असताना देखील बंडखोरांवर काही एक कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरांमुळे अडचणी वाढल्या आहेत.

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशा त-हेने निवडणुकीची तयारी केली होती. भाजप, सेनेत विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी राजकीय तणाव निर्माण झाल्यामुळे दोन्ही पक्षांची युती होणार नाही अशी अटकळ बांधून दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी आपापल्यापरीने मतदार संघाची चाचपणी व राजकीय गणिते जुळविण्यास सुरूवात केली होती. यातील काहींना पक्ष श्रेष्ठींनीच उमेदवारीचा शब्द देवून त्यांच्या शिडात हवा भरल्यामुळे इच्छूक जोमाने कामाला लागले. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप, सेनेची युती होवून दोन्ही पक्षांनी आपापल्या हक्काच्या जागा सोडून घेतल्या. परिणामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा बांधून असलेल्या इच्छूकांचा हिरमोड झाला व त्यांनी नामांकन दाखल करून पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा धरली. यातील काहींची समजूत काढण्यास पक्षश्रेष्ठंींना यश मिळाले तर काहींकडे पक्षानेच दुर्लक्ष करून त्यांच्या बंडखोरीला प्रोत्साहन दिले. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, नाशिक पश्चिम, इगतपुरी या तीन मतदार संघात सेनेने भाजपाविरूद्ध तर भाजपाने सेने विरूद्ध बंडखोरी केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी या संदर्भात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करून बंडखोरांना समजाविण्याची विनंती केली. पक्षानेही बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बंडखोरांचे बंड शमविले जाईल अशी आशा अधिकृत उमेदवार बाळगून होते. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीचा अखेरचा टप्प्यातील प्रचार संपुष्टात येण्याची वेळ झाली तरी देखील बंडखोरांवर कारवाई होवू शकलेली नाही. उलट पक्षी पक्षांकडून बंडखोरी करून काहीच कारवाई केली गेली नसल्याने पक्ष श्रेष्ठींचा आपल्याला आशिर्वाद आहे असे भासविण्याचा प्रयत्न बंडखोरांकडून केला जात आहे. त्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे अधिकृत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून होत असलेल्या प्रचाराला तोंड देतांनाच, बंडखोरांचाही सामना करावा लागत आहे. युतीतील दोन्ही पक्षांनी या बंडखोरांबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019