शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बेमोसमी पावसाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:52 IST

सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला.

सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला.कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याची संकटांनी यंदाही पाठ सोडलेली नाही. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शेतकर्‍यांना खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने जेरीस आणले आहे. दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस कोसळत असतानाच द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या अनेक बागा दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेत आहे. दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असणाऱ्या बागांना पाणी जास्त झाल्यास त्याची गळ आणि कूज होते. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने द्राक्षबागांना पुरेसे ऊन मिळत नाही. त्यामुळे भागांची गळ, कूच होऊ लागली आहे निफाड तालुक्यातील ३५ टक्के द्राक्षबागा गळीने खराब झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष पंढरीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे यंदा रोपांचा तुटवडा झालेला कांद्याच्या लागवडी घट झाली आहे लागवड केलेला कांदा पुन्हा पावसात सापडल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याचे उत्पादनात घट होणार आहे. पहाटे झालेल्या पावसात शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी तुंबले. कांद्याचे वाफे, द्राक्ष बागाच्या गल्ल्या आणि भाजीपाला या ठिकाणी पाणी तुंबल्याने सर्वच पिकांची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कधी अवकाळी पाऊस तर कधी गारांचा फटका, बेभावात विकणारा शेतमाल यामुळे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी होत चालला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्व पिके शेतामध्ये बहरलेला असतानाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करून टाकले.

टॅग्स :Nashikनाशिक