शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

By admin | Updated: September 10, 2014 01:49 IST

साऱ्याच पक्षांत एक तुष्ट बाकी असंतुष्ट...

महापालिकेत कोणतीही निवडणूक म्हटली की सर्वच पक्षांत कायम इच्छुक असणाऱ्यांचा एक संचच असतो. तो साऱ्याच निवडणुकांना इच्छुक असतो. निवडणुकीत अधिकृत उमेदवारी मिळणे वेगळे असले, तरी अनेकदा केवळ दावेदार राहणे हेदेखील महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. अर्थात, पालिकेत एक जुन्या जाणत्या मंडळींचे एक कोंडाळे आहे. अन्य नवागत मंडळींना मोक्याच्या जागा मिळू देत नाही, हीदेखील भावना आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. किंबहुना महापौरपदासाठी आरक्षण घोषित झाले तेव्हा बडगुजर यांची दावेदारी मानली जात होती. त्यांचे वरिष्ठ पातळीवर संबंध असल्यामुळे विधानसभेसाठी आपले नाव सुचवावे यासाठी अनेक इच्छुकांनी बडगुजर यांच्या नावाला टेकू लावला. त्यामुळे सेनेत बडगुजर यांच्यावरूनही राजी-नाराजीचे वातावरण होते. सकाळी पक्षश्रेष्ठींनी केवळ बडगुजर हेच उमेदवारी दाखल करतील म्हटल्यानंतर शिवसेना कार्यालयात त्याची प्रतिक्रिया उमटली. शैलेश ढगे आणि अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचे किमान अर्ज दाखल करू द्या ही विनवणी नाकारल्याने ते नाराज झाले. असाच प्रकार भाजपातही झाला. वसंत स्मृती येथे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत गटनेता संभाजी मोरूस्कर यांना उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यास सांगितल्यानंतर कमलेश बोडके यांच्यासह काही नगरसेवकांनी ओरड केली. प्रस्थापित नगरसेवक पदांची अदलाबदल करून पदे घेतात; आता उपमहापौर सतीश कुलकर्णी पदावरून उतरल्यावर त्यांना गटनेता करणार का, असा प्रश्न त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर बंड करण्याची तयारी दर्शविल्यानंतर फुलावती बोडके, सिंधू खोडे आणि ज्योती गांगुर्डे यांचे अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. कॉँग्रेसमध्ये उपमहापौरपदासाठी राहुल दिवे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्याचा ‘आदेश’ श्रेष्ठींनी दिल्यानंतर सारीच पदे एका व्यक्तीला देणार काय म्हणत अन्य काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे लक्ष्मण जायभावे, विमल पाटील यांना अर्ज दाखल करू देण्यात आला. मनसेत तर राज ठाकरे यांच्याच आदेशाला बगल देण्यात आली. महापौरपदासाठी संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून पाच ते सहा जणांना नाशिकमध्ये धाडण्यात आले होते. ‘रामायण’वर ही मंडळी पोहोचली व बैठक झाली. त्यानंतर सभागृह नेता शशिकांत जाधव आणि सुदाम कोंबडे या दोघांचेच अर्ज दाखल करण्याचे आदेश आले होते. परंतु ऐनवेळी आधी अशोक मुर्तडक यांचाही अर्ज दाखल करण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मग, मुर्तडकच सलीम शेख यांचाही अर्ज का भरत नाही, असा प्रश्न करीत त्यांचे एक नाव पुढे करण्यात आले. पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी असा प्रकार केल्याने अन्य इच्छुकांना नाराजी जाहीर करता आली नाही आणि आल्या पावली मुंबईत कॅम्पसाठी परतावे लागले. उमेदवारी कोणा तरी एकाला मिळणार, त्यासाठी संबंधित इच्छुक वरील नेते कसे मॅनेज करतात, यावर सारे ठरलेले असते. परंतु नेहमी डावलल्या जाणाऱ्यांच्या भावनांना वेळीच आवर घातला नाही तर कधी ना कधी त्याचा स्फोट होणारच.- संजय पाठक