शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून गळतीच्या घटनेचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 01:21 IST

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यातून दुर्घटना कशी घडली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रशासन यासंदर्भात आता फुटेजची तपासणी करणार आहे. त्यामुळे व्हॉल्व कसा फुटला, गळती कशी झाली याची वस्तुस्थिती समेार येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशक्यता : ठेकेदार रडारवर, पुरेसे तंत्रज्ञ नसल्याने घ्यावी लागली अन्य तंत्रज्ञांची मदत

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यातून दुर्घटना कशी घडली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रशासन यासंदर्भात आता फुटेजची तपासणी करणार आहे. त्यामुळे व्हॉल्व कसा फुटला, गळती कशी झाली याची वस्तुस्थिती समेार येण्याची शक्यता आहे.ऑक्सिजन गळतीबाबत वेगवेगळे  कारणे  सांगितली जात आहे. काहींनी टँकरमधून गॅस भरला जात असताना प्रेशरमुळे गळती झाल्याचा दावा केला होता. तर प्रशासनाने मात्र स्पष्ट कारण केले नसले तरी आयुक्त कैलास जाधव यांनी टाकीतून वेपरोयाझरमध्ये द्रवरूप ऑक्सिजन पाठवताना जोडणीवर गळती झाली असे सांगितले होते. ऑक्सिजन प्रेशरमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे नक्की काय झाले ते स्पष्ट होऊ शकले नव्हते. आता या टाकीच्या बाजूने आणि टाकीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधूनदेखील घटनाक्रम लक्षात येणार आहे. आता प्रशासन हे फुटेज घेणार आहे.दरम्यान, ऑक्सिजन टाकी दहा वर्षांसाठी भाड्याने घेतल्यानंतर या टाकीची देखभाल दुरुस्तीदेखील ठेकेदार कंपनीकडेच आहे. परंतु कंपनीकडे पुरेसे तंत्रज्ञच नाही किंबहुना एकच जण हे देखभाल दुरुस्तीचे काम करीत आहे. महापालिकेत सातत्याने काम करायचे असेल तर संबंधित ठेकेदाराला नाशिकमध्ये ऑफिस सक्तीचे करावे लागते, तसेच तंत्रज्ञदेखील आवश्यक असतो. महापालिकेने काढलेल्या निविदेत अशी अट होती की नाही आणि नसेल तर इतक्या महत्त्वाच्या विषयात शिथिलता का दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरदेखील संबंधित कंपनीचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले नाही, ते शुक्रवारी (दि.२३) दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.नव्या टाकीला अवघ्या २० दिवसांत गळतीरुग्णालयात ठेकेदाराने बसवलेली टाकी ३१ मार्चपासून वापरण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे अद्याप एक महिनाही झाला नाही. परंतु २१व्या दिवशी पाइपलाइनची गळती झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नवीन टाकीला गळती कशी काय लागू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.nऑक्सिजन टाकीत किती ऑक्सिजन आला आणि वापरला गेला अशा प्रकारच्या कामासाठी शहर अभियंता संजय घुगे यांनी बांधकाम विभागाचे दोन अभियंता नियुक्त केले होते. घटना घडली त्यावेळी ऑक्सिजन टँकरदेखील येणार होता, मग अशा वेळी संबंधित अभियंते नक्की कुठे होते असाही प्रश्न केला जात आहे.मनपाकडून अद्याप चाैकशी नाहीइतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने आपल्या स्तरावर तरी चौकशी करणे आवश्यक होते. मात्र, राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा केल्यानंतर महापालिकेने अशी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. 

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळतीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका