शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सायगावच्या सरपंचपदी अनिता खैरनार यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:30 IST

येवला : तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रगती पॅनलच्या अनिता गणपतराव खैरनार तर उपसरपंचपदी गणेश सुकदेव माळी विजयी झाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत ११ जागांपैकी प्रगती पॅनलला आठ जागा मिळाल्या आहेत. प्रतिस्पर्धी तिसर्‍या आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर एक अपक्ष उमेदरवाराने बाजी मारली होती. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेत विरोधी गटाने गुप्त मतदानाचा आग्रह धरला. त्यामुळे निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. सरपंचपदासाठी प्रगती पॅनलच्या उमेदवार अनिता खैरनार तर तिसर्‍या आघाडीच्या वतीने अरविंद उशीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर उपसरपंचपदासाठी तिसर्‍या आघाडीच्या वतीने भाऊसाहेब अहिरे तर प्रगती पॅनलच्या वतीने गणेश माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुप्त मतदान प्रक्रियेत प्रगती पॅनलच्या सरपंच, उपसरपंच यांना प्रत्येकी ८ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी तिसर्‍या आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी ३ मते मिळाली. निवडणुक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी सरपंचपदी खैरनार, उपसरपंचपदी माळी विजयी झाल्याची घोषणा केली. सभेस सदस्य संदीप पुंड, रंजना पठारे, रुपाली उशीर, शालन कुळधर, गणेश माळी, दिपक खैरणार, रेखा जानराव, अरविंद उशीर, भाऊसाहेब आहिरे, योगिता निघुट उपस्थित होते. निवडणुक कामकाजास सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तलाठी मनिषा इगवे व ग्रामसेवक प्रदीप बोडखे, किरण पठारे यांनी सहाय्य केले.निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाललाची उधळण करत जल्लोष साजरा केला. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रगती पॅनलचे नेते गणपतराव खैरनार, अ‍ॅड. सुभाष भालेराव, अनिल देशमुख, शांताराम देव्हडे, किरण भालेराव, अशोक कुळधर, विजय खैरनार, शरद लोहकरे, अमोल खैरनार, योगेश दारूंटे, मयुर खैरनार, पोपटराव भालेराव, संभाजी उशीर, कैलास पुंड, अरुण आव्हाड, बाळू साबळे, विक्रम देशमुख, देविदास जानराव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत