शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

मालेगावी अज्ञाताच्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 02:02 IST

मालेगाव शहरालगतच्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार केला. त्यात डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला.

मालेगाव : शहरालगतच्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार केला. त्यात डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. वडनेर खाकुर्डी पोलिसात रात्री उशिरापर्यंत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली.भायगाव शिवारातील संविधाननगर भागात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडला. ज्योती डोंगरे बंगल्यात एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने खोलीत प्रवेश करून ज्योती डोंगरे यांच्यावर दोन काडतुसे झाडली. फायरींगमुळे मोठा आवाज झाला. आजूबाजूच्या नागरिकांना काही समजण्याच्या आत अनोळखी व्यक्तीने गल्लीतून काटेरी झुडपांकडे पळ काढला. घटनेची माहिती कॅम्प व वडनेर खाकुर्डी पोलिसांना कळल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शशिकांत शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु, वडनेर खाकुर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोताळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.मृत महिलेचे पती जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.ज्योती डोंगरे यांच्या कुटुंबिय व नातलगांनी हंबरडा फोडला होता. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. या घटनेमुळे संविधाननगर भागात काहीकाळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशीरा सामान्य रुग्णालयात ज्योती डोंगरे यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारीMurderखून