शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला किमान कौशल्य विद्यापीठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:08 IST

राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील साडेतीनशे महाविद्यालयांतील एक लाख ६० हजार जागांपैकी बहुतांशी जागा रिक्त आहेत. येणाऱ्या काळात व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यापीठच बनविण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव असिम गुप्ता यांनी केले.

सिडको : राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील साडेतीनशे महाविद्यालयांतील एक लाख ६० हजार जागांपैकी बहुतांशी जागा रिक्त आहेत. येणाऱ्या काळात व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यापीठच बनविण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन उद्योजकता व कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव असिम गुप्ता यांनी केले.  नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् व नाशिक डिस्ट्रिक इनोव्हेटिव्ह कौन्सिल (एनडीआयसी) यांच्या पुढाकाराने नाशिक ‘इनोव्हेशन डे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, एनईसीचे उपाध्यक्ष के. एस. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी गुप्ता यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या स्टार्टअप पॉलिसीविषयी माहिती देऊन विविध क्षेत्रातील नवीन उद्योजकांना या पॉलिसीचा विविध उद्योगांसाठी कसा फायदा घेता येईल हे स्पष्ट केले. तसेच इनोव्हेशन आणि स्टार्टअप यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी तयार केलेली स्टार्टअपसाठी असलेले धोरण त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. तसेच इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारचा उपक्र म राबविण्याची गरज असल्याचे संगितले. एनईसीसारख्या इतर क्लस्टरची स्थापना करून त्यांचा उपयोग इंडस्ट्रियल हब म्हणून औद्योगिक क्षेत्राला नक्कीच होईल, असेही शेवटी असिम गुप्ता यांनी सांगितले. खासदार हेमंत गोडसे यांनी नवीन उद्योजकांसाठी विविध योजना राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आणि शहरातील प्रतिभावंत उद्योजक शहरातच कसे थांबतील याविषयीच्या उपाययोजना खासदार गोडसे यांनी अधोरेखित केल्या. जिल्हाधिकरी राधाकृष्णन बी. यांनी इतर मोठ्या शहरांशी स्पर्धा करण्यासाठी नाशिकला लाभलेल्या उत्पादन क्षेत्रात नावीन्यता आणणे उपयोगी ठरू शकते, असे सांगितले. कार्यक्र मात औद्योगिक पातळीवरील दहा प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले होते. के. एस. पाटील यांनी स्वागत केले.राज्याचे इनोव्हेशन धोरण ठरणारविविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यासाठी इनोव्हेशन धोरण तयार करण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती यावेळी प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी दिली. स्टार्टअप आणि इनोव्हेशन हे दोन पूर्णत: स्वतंत्र असून त्यामुळे इनोव्हेशनसाठी स्वतंत्र धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  नाशिक जिल्ह्यात नावीन्यपूर्ण संकल्पनांसाठी इनोव्हेशन क्लब स्थापन करावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन् यांनी सांगितले. अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ