शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

गावाने घडविले एकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:50 IST

नांदूरवैद्य : : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये वर्षभरातील सर्व सण, उत्सव हे एकजुटीने व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात.

ठळक मुद्देस्पर्धकांना बक्षिसे तसेच मंडळाचे प्रमाणपत्र अध्यक्षांच्या हस्ते अखेरच्या दिवशी वितरित करण्यात येते.

किसन काजळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये वर्षभरातील सर्व सण, उत्सव हे एकजुटीने व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात.नांदूरवैद्य या गावामध्ये शिवजयंती उत्सव हा ‘एक गाव, एक शिवजयंती’ या संकल्पनेनुसार अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या दोन मंडळांच्या वतीने साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव यावर्षी पहिल्यांदाच ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार एकत्र साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पहिल्याच वर्षी जय बजरंग क्रीडा मंडळ व भैरवनाथ महाराज मित्रमंडळाच्या दोन्हीही अध्यक्षांनी एकमताने ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय घेण्यात येऊन ‘एक गाव, एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार सर्व गणेश भक्तांनी नांदूरवैद्यच्या राजाची स्थापनाकेली.दहा दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा, खो-खो स्पर्धा, लिंबू चमचा, गायन, निबंध स्पर्धा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन या स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या स्पर्धकांना बक्षिसे तसेच मंडळाचे प्रमाणपत्र अध्यक्षांच्या हस्ते अखेरच्या दिवशी वितरित करण्यात येते.या गणेशोत्सव काळात दहाही दिवस गावामध्ये प्रसादाचे वाटप केले जाते. सकाळ, संध्याकाळ वाद्यांच्या गजरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात येते. रात्रीच्या आरतीप्रसंगी लहान मुलांच्या तसेच ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी नृत्याविष्काराची जुगलबंदी तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात.यानंतर शेवटच्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्र म सादर करण्यात येऊन सर्व ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. त्यानंतर चार वाजता संपूर्ण गावातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये गणेश मंडळाचे स्वयंसेवक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीवर लक्ष ठेवून असतात. या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चलचित्र देखावा साकारण्यात येत असल्यामुळे हा देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरते. सदर देखावा पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला गावकऱ्यांची मोठी गर्दी होत असते.यावर्षी शिवचरित्रकार सागर महाराज दिंडे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. उत्सव आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावकºयांना निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून या  सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. यामुळेच दिवसेंदिवस सार्वजनिक मंडळांची संख्या जशी वाढत आहे तशीच सार्वजनिक गणपतींच्याही संख्येत वाढ होऊ लागली आहे.गावातील सर्वधर्मीयांमध्ये एकोपा राहावा तसेच जातीय सलोख्याच्या माध्यमातून गावात शांतता नांदावी यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवित असल्याचे यावेळी नांदूरवैद्य येथील जय बजरंग क्रीडा मंडळ व भैरवनाथ महाराज मित्रमंडळाच्या दोन्हीही अध्यक्षांनी यावेळी सांगितले असून, या संकल्पनेचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने एकमताने स्वीकार करण्यात आला आहे. गावकरी मोठ्या आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतात.‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पने मुळे गावामध्ये शांततेचे वातावरण तयार होण्यास मदत होईल तसेच दोन्हीही मंडळांच्या गणपती उत्सवाच्या खर्चाला फाटा देत तो खर्च एकाच सार्वजनिक गणेश उत्सवासाठी खर्च केला जातो. उर्वरित रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च केली जाणार आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना या माध्यमातून शालेय साहित्य देऊन मदत करण्यात येणार आहे. यामुळे गावात सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल.- संदीप काजळे,अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नांदूरवैद्य