शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

विरोधकांची एकी; भाजपात बेकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:46 IST

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवारीवरून सत्ताधारी भाजपात नाराजीनाट्य बघायला मिळाले तर विरोधीपक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरुद्ध शड्डू ठोकले आहे. गुरुवारी (दि.१५) स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी सत्ताधारी भाजपात रंगलेल्या नाराजीनाट्यामुळे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देस्थायी समिती : सभापतिपदावरून सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्यपहिल्यांदाच एका महिलेला स्थायी समितीच्या सभापतिपदी संधी

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवारीवरून सत्ताधारी भाजपात नाराजीनाट्य बघायला मिळाले तर विरोधीपक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरुद्ध शड्डू ठोकले आहे. गुरुवारी (दि.१५) स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी सत्ताधारी भाजपात रंगलेल्या नाराजीनाट्यामुळे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्या अडचणी वाढल्या आहेत.महापालिका स्थायी समितीवर भाजपा-९, शिवसेना-४ आणि कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेच्या कोट्यातून प्रत्येकी एक सदस्य, असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत मुंढेपर्व अवतरल्यानंतर यंदा स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुकांनी हात आखडता घेतला आणि सत्ताधारी भाजपाने नऊपैकी सर्वाधिक ७ महिला सदस्यांना स्थायीचे सदस्यपद बहाल केले. याशिवाय, सभागृहनेता दिनकर पाटील आणि स्थायीचे माजी सभापती उद्धव निमसे हे सभापतिपदासाठीचे प्रबळ दावेदारही स्थायीवर सदस्य म्हणून पाठविले. त्यामुळे सभापतिपदासाठी पाटील-निमसे यांच्यात चुरस निर्माण झालेली असतानाच माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांच्या पुतणी आणि माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब अहेर यांच्या कन्या हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव पुढे आले आणि नाराजी नाट्याला प्रारंभ झाला. गुरुवारी (दि.१५) सत्ताधारी भाजपातील नऊही सदस्यांना पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात बोलावून घेण्यात आले. प्रदेशाध्यक्षांकडून उमेदवारीसाठी नावाची प्रतीक्षा करण्यात आली. मात्र, हिमगौरी अहेर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजताच दिनकर पाटील, उद्धव निमसे यांचेसह भिकुबाई बागुल, मीरा हांडगे, भाग्यश्री ढोमसे यांच्यातून नाराजीचे सूर उमटायला लागले. वसंतस्मृतीवरून सर्व सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी येऊन धडकले. याठिकाणी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर हिमगौर अहेर, भाग्यश्री ढोमसे आणि मीरा हांडगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या दिनकर पाटील यांनी जवळच्या नातेवाइकाचे निधन झाल्याचे निमित्त दाखवत ‘रामायण’ सोडले तर उद्धव निमसे यांनी आमदारांना खडे बोल सुनावले. तीन आमदारांच्या भांडणात कार्यकर्त्यांचा बळी जात असल्याची भावनाही यावेळी व्यक्त झाली, शिवाय अन्याय होत असेल वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असा इशाराही दिला गेला. अर्ज दाखल करण्यासाठी अर्धा तासाचा अवधी शिल्लक असल्याने महापौरांसह भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर हे तीनही महिला इच्छुक उमेदवारांचे अर्ज सोबत घेऊन नगरसचिव विभागात आले.यावेळी तीनही महिला उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील, असे सांगितले जात असतानाच संभाजी मोरुस्कर यांनी केवळ हिमगौरी अहेर यांचेच अर्ज दाखल केले. त्यामुळे भाग्यश्री ढोमसे व मीरा हांडगे यांच्यात नाराजी दिसून आली. त्यापाठोपाठ भिकुबाई बागुल यांचे सुपुत्र व स्थायीचे माजी सभापती संजय बागुल यांनीही अर्ज दाखल करण्याची तयारी चालवली होती परंतु, स्वत: भिकुबाई बागुल यांनीच आपल्या पुत्राला रोखले आणि भाजपाकडून केवळ एकमेव उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला. सत्ताधारी भाजपात बेकीचे वातावरण दिसून येत असतानाच शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी यांनी एकत्रित येत सेनेच्या संगीता जाधव यांचा अर्ज दाखल करत एकीचे दर्शन घडविले आणि भाजपाविरुद्ध शंख फुंकला. आता या नाराजीनाट्याचा विरोधकांकडून कशाप्रकारे फायदा उठविला जातो, हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.निमसे-पाटील यांचा ‘ब्लाइंड गेम’स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी सभागृहनेता दिनकर पाटील यांना प्रदेश स्तरावरील नेत्याकडून शब्द मिळाला होता, असे सांगितले जाते. त्यानुसार, वर्षा भालेराव यांच्याऐवजी दिनकर पाटील यांची स्थायीच्या सदस्यपदी वर्णी लावण्यात आली होती तर उद्धव निमसे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी इच्छा व्यक्त केली नसतानाही स्थायीचे सदस्यपद बहाल करण्यात आले. पाटील-निमसे यांना एकाच आखाड्यात उतरवून झुंज लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पाटील व निमसे यांच्याऐवजी हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव पुढे आणले गेले आणि पाटील-निमसे यांचा ब्लाइंड गेम करण्यात आल्याची भावना पक्षात पसरली. महिलेला संधी देण्यासाठी हिमगौरी अहेर यांचे नाव अंतिम केल्याचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगताच पाटील-निमसे यांनी ‘महिलाराजच आणायचे ठरले होते तर आम्हाला स्थायीवर कशासाठी पाठविले’असा सवाल उपस्थित केला. त्यातून आमदार व पाटील-निमसे यांच्यात शाब्दिक चकमकीही झडल्याचे समजते. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. आमदार बाळासाहेब सानप यांच्याच आदेशानुसार पक्ष चालतो. ते सांगतील तसेच आम्ही ऐकतो. आता स्थायी समितीच्या सदस्यपदीही ठेवायचे की नाही, हे बाळासाहेब सानप हेच ठरवतील. - दिनकर पाटील, सभागृहनेतापक्षाने पहिल्यांदाच एका महिलेला स्थायी समितीच्या सभापतिपदी संधी दिलेली आहे. पक्षाचा निर्णय मान्य आहे. माझी कोणतीही नाराजी नाही. पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार वाटचाल करू.- उद्धव निमसे, सदस्य, स्थायी समिती