शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हुबेहूब शिल्प साकारत नेताजींना अनोखी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:40 IST

राष्टपुरुषांचे पुतळे किंवा शिल्प सर्वांनीच बघितलेले असतात, परंतु त्यापलीकडे जाऊन संत महात्मे, साहित्यिक इतकेच नव्हे नाशिकमधील कलांवतांच्या हुबेहूब साकारलेल्या शिल्पकृतींचे प्रदर्शन येथील हार्मनी आर्ट गॅलरीत मंगळवारी (दि.२९) सुरू झाले.

नाशिक : राष्टपुरुषांचे पुतळे किंवा शिल्प सर्वांनीच बघितलेले असतात, परंतु त्यापलीकडे जाऊन संत महात्मे, साहित्यिक इतकेच नव्हे नाशिकमधील कलांवतांच्या हुबेहूब साकारलेल्या शिल्पकृतींचे प्रदर्शन येथील हार्मनी आर्ट गॅलरीत मंगळवारी (दि.२९) सुरू झाले.ज्येष्ठशिल्पकार (कै.) नेताजी भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित या प्रदर्शनात भोईर यांचीही दोन अप्रतिम शिल्प ठेवण्यात आली आहेत.शहरातील मान्यवर शिल्पकार आणि हार्मनी यांच्या वतीने कॉलेजरोडवरील गॅलरीमध्ये भोईर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले असून, मंगळवारी (दि.२९) या प्रदर्शनाचे उद््घाटन ग्रंथप्रेमी विनायक रानडे यांच्या हस्ते व ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून बारा बलुतेदार महासंघाचे अरुण नेवासकर तसेच शिल्पकार सुरेश नेताजी भोईर, झारखंड येथील पर्यावरणप्रेमी श्रीराम डाल्टन उपस्थित होते.  या प्रदर्शनात सर विश्वेश्वरय्या, संत जनार्दन स्वामी, अनिरुद्ध बापू, गणेश बाबा, शंकर महाराज यांच्याबरोबरच नेताजी भोईर, मंगेश पाडगावकर, नाशिकचे कलावंत सी. एल. कुलकर्णी तसेच नाशिकच्या कलाक्षेत्रातील मान्यवरांचे शिल्प प्रदर्शित करण्यात आले आहे. यतिन पंडित, श्रेयस गर्गे, नीलेश ढेरे, वरुण भोईर, सुरेश भोईर, शरद मैंद, प्रा. योगेश गटकळ, प्रा. भूषण कोंबळे, प्राचार्य सचिन जाधव, सागर शिरसाठ यांनी या कलाकृती साकारल्या आहेत.यावेळी प्रमुख अतिथींनी एका शिल्पकाराच्या श्रद्धांजलीपर अशाप्रकारचे प्रदर्शन भरविणे हे उचित तर आहेच, परंतु कला क्षेत्रातील दादा मानल्या जाणाऱ्या नेताजी भोईर यांना ही खरोखरीच श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले, तर आपल्या सभोवताली जे नाही हेच कलावंतांना हवे असते आणि मनातील निसर्ग चित्राच्या भावना ते कॅनव्हासवर अभिव्यक्त करताते असे सांगून भोवतालचे पर्यावरण नष्ट होत चालल्याची खंत श्रीराम डाल्टन यांनी व्यक्त केली. प्रा. बाळ नगरकर यांनी सूत्रसंचालन, तर राजा पाटेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :artकला