शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित, आंतरजिल्हा शिक्षक अधांतरीतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:13 IST

राज्य सरकारने जिल्हा परिषदेची शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या १३८८ शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ नेमणुकीच्या जागेवर सोडून नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेण्यात आले असले तरी, बदलून आलेल्या शिक्षकांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना गेल्या तीन दिवसांपासून कोठेही नेमणूक नसल्यामुळे शेकडो शिक्षक रिकामे बसून आहेत.

ठळक मुद्देआदेशाची प्रतीक्षा : नेमणूक नसल्याने शिक्षक ‘जैसे थे’

नाशिक : राज्य सरकारने जिल्हा परिषदेची शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या १३८८ शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ नेमणुकीच्या जागेवर सोडून नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेण्यात आले असले तरी, बदलून आलेल्या शिक्षकांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना गेल्या तीन दिवसांपासून कोठेही नेमणूक नसल्यामुळे शेकडो शिक्षक रिकामे बसून आहेत.शासनाकडून विस्थापित शिक्षकांची यादी प्राप्त होत नसल्यामुळे अशा शिक्षकांची व आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांना नेमणूक देण्यात जिल्हा परिषदेची अडचण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांकडून शासनाने आॅनलाइन अर्ज मागवून त्यांच्या बदलीची प्रक्रिया शासनस्तरावरून राबविली. मुळात शाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच शासनाने ही प्रक्रिया पूर्ण करावयास हवी होती.तथापि, ऐन शाळा सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी शिक्षकांकडून अर्ज मागविले व शाळेच्या एक दिवस अगोदर बदल्यांचे आदेश जारी केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तत्परतेने बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश बजावून त्यांना एका दिवसातच बदलीच्या जागी सोडून नियुक्तीच्या जागेवर रुजू करून घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले असले तरी, जिल्ह्णातील २३०० शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते, त्यापैकी १३८८ शिक्षकांच्याच बदल्या झाल्या आहेत. उर्वरित शिक्षकांचा समावेश विस्थापितांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदली झालेले शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले; मात्र ते ज्यांच्या जागी बदलून गेले त्या शिक्षकांना पुढील कोणतेही आदेश नसल्याने ते आहे त्याच शाळेत थांबले आहेत. त्यामुळे काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक झाले तर काही शाळांमध्ये शिक्षक अपुरे पडले आहेत.शासनाकडून जिल्हा परिषदेला विस्थापित शिक्षकांची यादी पाठविण्यात येणार असून, त्या सर्वांना समुपदेशनाने रिक्त जागांवर नेमणूक दिली जाणार आहे. मात्र शासनाकडून चार दिवस उलटूनही यादी आलेली नाही.शासनाने गेल्या आठवड्यात ५१ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने पाठविले आहेत, तसेचयापूर्वीही ११६ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्णात दाखलआहेत. या शिक्षकांनादेखील नियुक्त्या देण्यात अडचण निर्माण झाली आहे.चार शाळांचे नव्याने बांधकामअलीकडे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील चांदवड व देवळा तालुक्यातील चार शाळांची पडझड झाली असून, तातडीची बाब म्हणून या शाळांचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदTeacherशिक्षकTransferबदली