शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश खरेदीचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:22 IST

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यावरून ठेकेदारांमधील स्पर्धा त्यातून निर्माण होणारा राजकीय दबाव मुुख्याध्यापकांची डोकेदुखी ठरल्यानंतर आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विषयात लक्ष घातले असून, पाच गणवेश प्रकाराचे नमुने मागवले आहेत. त्यामुळे आता हा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात असून, तेच आता निवडा करणार आहेत.

नाशिक : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यावरून ठेकेदारांमधील स्पर्धा त्यातून निर्माण होणारा राजकीय दबाव मुुख्याध्यापकांची डोकेदुखी ठरल्यानंतर आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विषयात लक्ष घातले असून, पाच गणवेश प्रकाराचे नमुने मागवले आहेत. त्यामुळे आता हा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात असून, तेच आता निवडा करणार आहेत.  नाशिक महापालिकेच्या ९० शाळांमध्ये सुमारे २९ हजार विद्यार्थी असून, त्यांना डीबीटीऐवजी आता थेट गणवेश खरेदीसाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने गणवेश देण्यात येणार आहेत. गेल्या वेळी प्रतिविद्यार्थी दोनशे रुपये अशी प्रतिगणवेशाची रक्कम होती व दोन गणवेश द्यायचे होते.यंदा मात्र प्रतिगणवेश रक्कम तीनशे रुपये करण्यात आली असून, शासनाने दर्जा वाढविण्यासाठी रकमेत वाढ केली असली तरी प्रत्यक्षात त्यामुळे कमिशन वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप वाढीला लागला आहे. संबंधित शाळांच्या व्यवस्थापन समितीला गणवेश घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात असताना शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशात गणवेशाबाबत केंद्रीय किंवा तालुका स्तरावरून कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नसेल असे स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतरदेखील शाळांवरगेल्यावर्षीचेच गणवेश देण्याबाबत दबावतंत्र सुरू झाले होते. अनेक ठेकेदारांनी ७० ते ८० रुपयांचे गणवेश देण्याची तयारी दर्शविली. त्यातील काहींनी तर त्याचे संबंधितांना किती कमिशन देण्यात येर्ईल, याचे वेळापत्रकच तयार केले.  गेल्या महिन्यात आयुक्तांनी महाकवी कालिदास कलामंदिरात  घेतलेल्या बैठकीत मुख्याध्यापकांवर  कोणताही दबाव नसेल असे स्पष्टीकरण देऊनदेखील त्यात फरक न पडल्यान् ो अखेरीस आयुक्तांनी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या गणवेशाचे नमुने प्रशासनाधिकाऱ्यांमार्फत मागितले असून, त्यावर ते स्वत: निर्णय देणार आहेत. आयुक्त किती प्रकारच्या गणवेशांना परवानगी देतात, याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका