शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

युनिफाइड डीसीपीआर;  आज कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:26 IST

बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल आणणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संदर्भात शंका-निरसनासाठी दि. ११ रोजी कालिदास कलामंदिर येथे सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

नाशिक : बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल आणणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संदर्भात शंका-निरसनासाठी दि. ११ रोजी कालिदास कलामंदिर येथे सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस यूडीसीपीआर तयार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे नगरचना विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते, सहसंचालक अविनाश पाटील, पुणे महानगरपालिकेचे सुनील मरळे व सेवानिवृत्त उपसंचालक, नगररचना विभाग संजय सावजी यांचे सादरीकरण होणार आहे. ही कार्यशाळा निमंत्रीतांसाठीच असून, नगररचना विभाग तसेच मनपा, नगरपरिषद, नगरपंचायतमधील तांत्रिक कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेस क्रेडाई राष्ट्रीयचे सल्लागार जीतूभाई ठक्कर, कोषाध्यक्ष अनंत राजेगाकर, महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेचे नियोजन नाशिकर विभाग नगररचना सहसंचालक प्रतीभा भदाणे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले आहे. नगररचना विभागाचे राज्याचे संचालक सुधाकर नागनुरे, संचालक श्रीरंग लांडगे, नोरेश्वर शेंडे, निवृत्त संचालक राजन कोप, कमलाकर अकोडे आदि उपस्थित राहणार आहे.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांजि प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यशाळेस क्रेडाई राष्ट्रीयचे सल्लागार जितूभाई ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नगररचना नाशिक विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे व क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन तसेच सर्व सभासद प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार