शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सामनगाव रोड अश्विनी कॉलनी येथे  विचित्र घटनेत पित्याचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:33 IST

हळदीचा कार्यक्रम सुरू असताना इमारतीच्या गच्चीवरून पडलेली मुलगी पित्याच्या अंगावर कोसळल्याने झालेल्या अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री सामनगाव रोडवरील अश्विननगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिकरोड : हळदीचा कार्यक्रम सुरू असताना इमारतीच्या गच्चीवरून पडलेली मुलगी पित्याच्या अंगावर कोसळल्याने झालेल्या अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री सामनगाव रोडवरील अश्विननगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सामनगाव रोड अश्विनी कॉलनी येथे मनपा घरकुल योजनेच्या पाच मजली इमारती आहेत. गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास विजय गोदडे यांची पुतणी रोहिणी हिचा हळदीचा कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी गर्दी झाली होती. नातेवाईक हळदीच्या कार्यक्रमात रंगले होते. यावेळी मुलगी सुनंदा विजय गोदडे (वय १६) ही इमारतीच्या गच्चीवरून हळदीचा कार्यक्रम पाहत होती. याचवेळी तिचा तोल गेल्याने ती खाली कोसळली आणि गर्दीत उभे असलेले वडील विजय किसन गोदडे (वय ३८) यांच्या डोक्यावर पडली. या आघातामुळे ते बेशुद्ध पडले. जखमी विजय गोदडे व मुलगी सुनंदा यांना नातेवाइकांनी त्वरित बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी जखमी विजय गोदडे यांना तपासून मयत घोषित केले, तर जखमी सुनंदा हिला फ्रॅक्चर झाल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  दरम्यान, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाताच्या या विचित्र घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.विजय गोदडे यांनी केला वाचविण्याचा प्रयत्नक्षणार्धात घडलेल्या या घटनेत पित्याने मुलीला वाचविण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र सर्वकाही एका क्षणात घडले की विजय यांना वेळच मिळाला नाही. मुलीचा इमारतीवरून तोल गेल्यानंतर काहीशी धावपळ आणि आरडाओरड झाली. याच दरम्यान हळदीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या विजय यांना काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव झाली आणि मुलीला वाचविण्यासाठी ते सरसावले. परंतु पाचव्या मजल्यावरून अतिवेगात मुलगी थेट अंगावरच कोसळल्याने विजय गोदडे जखमी झाले आणि त्यांची शुद्ध हरपली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उशीर झाला होता.

टॅग्स :Accidentअपघात