शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:18 IST

राज्यात कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध लावण्यात आल्याने सारे जनजीवन ठप्प झाले आहे. त्याचा फटका सामान्य कामगारांना बसत असून,  शहरातील यंत्रमागदेखील गेल्या महिना भरापासून बंद असल्याने लाखो यंत्रमाग कामगारांची उपासमार होत आहे.  

ठळक मुद्देआर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी

शफीक शेख / मालेगाव :  राज्यात कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध लावण्यात आल्याने सारे जनजीवन ठप्प झाले आहे. त्याचा फटका सामान्य कामगारांना बसत असून,  शहरातील यंत्रमागदेखील गेल्या महिना भरापासून बंद असल्याने लाखो यंत्रमाग कामगारांची उपासमार होत आहे.   शहरात सुमारे एक ते दीड लाख कामगार काम करतात.  यंत्रमागावर त्यांना दर आठवड्याला मजुरी मिळते.  मात्र कडक निर्बंधांमुळे शहरातील यंत्रमागांचा खडखडाट बंद झाला असून, लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांना भाजीपाला विकणे, रसवंती चालवणे अशी इतर कामे शोधावी लागत आहेत. झोपडपट्ट्यामध्ये आधीच दारिद्र्यात खितपत पडलेल्या यंत्रमाग मजुरांचे हाल होत असल्याने राज्य शासनाने त्यांच्या बँक खात्यावर पैसे  टाकून आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. निर्बंधांमुळे स्पिनिंग मिल्स बंद आहेत.  त्यामुळे  प्रकिया करण्यासाठी देशभरात पाली, बालोतरा अहमदाबाद , सुरत येथे माल विकला जातो.  तामिळनाडू, केरळ, कर्नाटक येथेही माल जातो, मात्र बंदमुळे तेथे माल  पाठविता आलेला नाही.   रिटेल मार्केटही बंद असल्याने माल घ्यायला कुणी तयार नाही.  काही यंत्रमाग धारकांनी ५० टक्के कामगारांना घेऊन यंत्रमाग सुरू करण्याचा प्रयत्न केला.न घरका, ना घाटका....n सव्वा लाख यंत्रमाग कामगार बेकार झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. यंत्रमाग चालकांनी रमजान ईदनिमित्त कामगारांना बोनस दिला. काही प्रमाणात उचलदेखील दिली.  n काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. मात्र हातांना काम नसल्याने यंत्रमाग कामगारांची अवस्था ‘न घरका ना घाटका’ अशी झाली आहे. n राज्य शासनाने रेशनिंगचे धान्य वाढवून यंत्रमाग मजुरांना मदत करावी. शासनाबरोबरच श्रीमंत नागरिकांनी त्यांना आर्थिक मदत करावी. 

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या