शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

मुळडोंगरीत बंधारा दुरु स्तीचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:45 IST

नांदगाव : मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरुस्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून, ते मजुरांकडून न करता जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले, या भगवान मोरे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथा उपजिल्हाधिकारी उमप नाशिक यांनी नांदगाव येथे भेट देऊन संबंधित व्यक्तींची चौकशी केली.

ठळक मुद्देनांदगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत जेसीबी मशीनच्या साहाय्याने काम केल्याची तक्रार

नांदगाव : मुळडोंगरी येथील रोजगार हमी योजनेंतर्गत बंधारा दुरुस्तीचे काम अर्धवट स्वरूपात असून, ते मजुरांकडून न करता जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात आले, या भगवान मोरे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अतिरिक्त तक्र ार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो) तथा उपजिल्हाधिकारी उमप नाशिक यांनी नांदगाव येथे भेट देऊन संबंधित व्यक्तींची चौकशी केली.मोरे यांच्या तक्रारीची येथील पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून त्यांना नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागली. त्यावरून पुढील चक्रे फिरली. दुष्काळी परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी मजुरांना काम मिळावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जॉब कार्डधारकांना दुरुस्ती व इतर हातांनी करावयाच्या कामाची कल्पना देऊन काम द्यावयाचे असा उद्देश आहे. मात्र प्रस्तुत प्रकरणात गरजूंच्या हातांना मिळणारे काम हिसकावून घेऊन यंत्राच्या साहाय्याने करण्यात आल्याच्या तक्रारीला गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाने टोपली दाखवल्याने वरिष्ठांना साकडे घालण्याची वेळ मोरे व इतरांवर आली. दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आलेले अंदाजे २० लाखांचे काम अद्याप ही अपूर्ण आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील लोकप्रतिनिधी व अधिकारी असे काही झालेच नाही. चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असा दावा करत आहेत.जेसीबीने काम करून घेणे फसवणूकमोरे यांच्या तक्रारीनुसार जेसीबीने काम करून घेणे ही शासनाची फसवणूक आहे, तर मजुरांच्या तोंडचा घास काढून घेऊन आपले खिसे भरण्याचा प्रकार आहे. चौकशीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मजुरांचे फावडे, घमेले असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. आता खोटे पुरावे सादर करण्याच्या प्रयत्नात लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकारी एकवटले आहेत. मजुरांना न्याय मिळावा, अशी मोरे यांची मागणी आहे.