शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटींचे प्रकल्प साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:21 IST

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक : निविदांचा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचा निर्णय

ठळक मुद्देमाहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची व्याप्ती पाहता कंपनीच्या वार्षिक अंदाजपत्रकात सुधारणा जनसंपर्क अधिकारी, लघुलेखक यांच्यासह ८ तांत्रिक पदांनाही मंजुरी

नाशिक - माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सदर प्रकल्पांना गति मिळण्यासाठी ९० दिवसांचा निविदा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचाही महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची व्याप्ती पाहता कंपनीच्या वार्षिक अंदाजपत्रकात सुधारणा करण्यात आली. यावेळी, माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने, स्मार्ट सिटी आॅपरेशन सेंटर, स्मार्ट कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर, सिटीझन एक्सपिरियन्स सेंटर, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, स्मार्ट पार्कींग मॅनेजमेंट सिस्टम याशिवाय, सेन्सर, वायफाय सिस्टम यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पांना गति मिळावी यासाठी निविदा कालावधी ४५ दिवसांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, बैठकीत जनसंपर्क अधिकारी, लघुलेखक यांच्यासह ८ तांत्रिक पदांनाही मंजुरी देण्यात आली. यावेळी, सुरक्षित नाशिकचा आढावा घेण्यात आला. पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी त्यातील काही अडचणी सांगितल्या. आॅप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे बदललेले सचिव श्रीनिवासन यांचेशी चर्चा करण्याचे ठरले. सोलर पॅनल आणि पायलट स्मार्ट रोडच्या निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली. येत्या सप्ताहात आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट पथदीप, स्मार्ट पार्कींग, पब्लिक सायकल शेअरिंग, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत पायाभूत सुविधा व सुशोभिकरण या प्रकल्पांच्याही निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला, कंपनीचे संचालक महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते, तज्ज्ञ संचालक तुषार पगार यांचेसह अन्य संचालक, अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकtechnologyतंत्रज्ञान