शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

सप्तशृंग गड कोरोनाच्या सावटाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 14:45 IST

सप्तशृंग गड:कोरोनाच्या सावटाखाली असल्याने शुकशुकाट कळवण :सप्तशृंग गड:कोरोनाच्या सावटाखाली असूनमंदीर, ट्रॉली, दुकान, लॉज, एस टी बस, खासगी वाहतूक बंद ...

ठळक मुद्दे मंदीर, ट्रॉली, दुकान, लॉज, एस टी बस, खासगी वाहतूक बंद

सप्तशृंग गड:कोरोनाच्या सावटाखाली असल्याने शुकशुकाटकळवण :सप्तशृंग गड:कोरोनाच्या सावटाखाली असूनमंदीर, ट्रॉली, दुकान, लॉज, एस टी बस, खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर दैनंदिन धार्मिक विधी व्यतिरिक्त बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे. येत्या २ ते ८ एप्रिल या कालावधीत होणार्या चैत्रोत्सवावर करोनाचे सावट पडले असून, भाविक, पर्यटक यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा भाग समजून यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहेयात्रोत्सवानिमित्त सप्तश्रुंग गडावर लाखो भाविकांची रेलचेल सुरू असते. फनिक्युलर ट्रॉलीचे आकर्षण म्हणून या परिसरातही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मंदिर बंद म्हटल्यावर ट्रॉलीदेखील बंद राहणार आहे. स्थानिक ग्रामस्थ व त्यांची वाहने वगळता नांदूरीहून गडावर ये-जा करणार्या सर्वच परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच खासगी वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सप्तशृंगी देवी गडावरील सर्व दुकाने, लॉजिंग करोना विषाणूच्या धर्तीवर बंद ठेवण्याचा निर्णयही स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी मंडळीने घेतला आहे. करोनाच्या धास्तीने गडावर येणार्या भाविक, पर्यटकांची रेलचेल काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर व दुकानांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे निदर्शनास येत आहे. चैत्रोत्सवानिमित्त दोन पैसे पदरात पडले असते असे म्हणणारे व्यावसायिक बैठकीनंतर आधी आरोग्य महत्त्वाचे मग यात्रा असे म्हणत आपल्या व भाविक, पर्यटकांची काळजी वाहू लागल्याचे दिसून आले.दरम्यान, देवस्थान ट्रस्ट कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांना आपल्या व दुसर्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. सप्तशृंगी देवी गडाच्या इतिहासात चैत्रोत्सवावरकरोनाचे विरजण पडले असून, यात्रोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपर्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांची मांदियाळीगडावर येऊ शकणार नाही. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये. चैत्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी गडावर येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापन, ट्रॉली प्रशासन, ग्रामपंचायत विभाग व स्थानिक ग्रामस्थ यांनी संयुक्तकरित्या निर्णय घेत यात्रोत्सव रद्द केला.