शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेतंर्गत मुली असलेल्या पालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 17:58 IST

सिन्नर : येथील विद्यावर्धीनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहीमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

सिन्नर : येथील विद्यावर्धीनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहीमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला.विद्यावर्धीनीनगी येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदल्या दिवशी मंदिराच्या समोर होमहवन करून ‘श्री’च्या पादुकांचा महाभिषेक करण्यात आला. सकाळी ‘श्रीं’चे चक्री पारायण करण्यात आले.श्रींच्या पादुकांचा पालखी सोहळा विजयनगर, खर्जेमळा, कोठूरकरमळा या मार्गे जाऊन श्रींच्या मंदिरात सोहळ्याची सांगता करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता संस्थेचे अध्यक्ष राजेश कमानकर यांच्या हस्ते गजानन महाराजांची महाआरती तर गणेशाची आरती संस्थेचे सदस्य संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अर्पण ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर फक्त मुली असणाऱ्या सुनील डावरे, विजय हिंगे, प्रविण कमानकर, राजमोहन ओझा, भास्कर कोठूरकर, सुशीलकुमार सांगळे, अरुण उगले, ऋषीकेश भसे आदी पालकांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक