शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बेलगाम, नाशिककरांना फुटला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:55 IST

नाशिक : शहरात येणाऱ्या घुसखोरांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याची ओरड होत असताना सोमवारी (दि.३) आणखी एक बाधित सापडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

नाशिक : शहरात येणाऱ्या घुसखोरांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याची ओरड होत असताना सोमवारी (दि.३) आणखी एक बाधित सापडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. लपून छपून आणि वैद्यकीय उपाचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या संपर्र्कात आल्याने एका वैद्यकीय व्यावसायिकालाच कोरोनाची लागण झाल्याची महापालिकेची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर संबंधित बाधित रुग्णाच्या घराजवळील म्हणजेच जनरल वैद्यनगर परिसर सील करण्यात आला आहे.तथापि, आतापर्यंत नाशिक शहरात सापडलेल्या रुग्णांपैकी अवघे दोन ते तीन मूळ शहरातील असून, बाकी बाहेरील तर आहेच, शिवाय अशा बाहेरील व्यक्तींमुळे स्थानिकांना संसर्ग वाढल्याचे आढळले आहे. सीमेवरील पोलीस यंत्रणा शिथिल झाल्याने आणि प्रसंगी वेगवेगळी कारणे सांगून शहरात शिरत असल्याने नाशिककरांना मात्र घाम फुटला आहे.नाशिक शहरात सोमवारी (दि. ४) एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरातील रुग्ण संख्या वाढून सतरा झाली आहे. मालेगाव कोरोनाचा हॉट स्पॉट, तर नाशिक शहर नियंत्रित स्थितीत असताना आता मात्र शहरातदेखील धोका वाढला आहे. केवळ यामुळेच नाशिक शहर रेड झोनमध्ये गेले आहे. या प्रकारामुळे नाशिककर अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे मुंबई-पुण्याजवळील लगतचे शहर असताना शहरातील स्थिती नियंत्रित असल्याने महापालिकेच्या यंत्रणेचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे शहराच्या सीमा सील करण्याची जबाबदारी पोलिसांची असतानाही सर्वच ठिकाणी नियंत्रण ढासळल्याचे दिसत आहे. सीमा सील असतानाही शहरात परप्रांतीयांचे जत्थे शिरत असून, नाशिकमार्गे जाताना ते अनेकांच्या संपर्कात येत असल्याने धोकादायक स्थिती आहे. मालेगावबरोबरच अन्य ठिकाणांहून येणाऱ्यांची कोणतीही विचारपूस केली जात नाही, असा महापालिकेच्या यंत्रणेला संशय आहे. मुंबई आणि पुण्यावरून येणाºयांनाही सहज प्रवेश मिळू लागल्याने त्याचादेखील फटका सिडको-अंबड लिंकरोड परिसरातील कोरोना बाधितांच्या प्रकरणात बसल्याचे दिसले आहे.----१४२ नमुन्यांच्या अहवालांकडे लक्षकोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने त्यांच्या घराच्या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढत आहे. नव्या सहा प्रतिबंधित क्षेत्रातील दोन हजार ४६९ घरांमधील ९ हजार ३७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. शहरात अलीकडे आढळलेल्या सहा बाधितांच्या संपर्कातील १४२ नागरिकांचे घसा स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाकडे महापालिकेचे लक्ष लागून आहे.---------------४५ रुग्णांवर उपचारनाशिक शहरात आजमितीस १७ कोरोनाबाधित आढळले असले तरी कोरोनाबाधित शहरात येऊन उपचार घेत असलेल्यांची संख्या ४५ असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी येणाºयांबाबतही आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक