उपनद्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असते. नासर्डी नदी, तर अस्वच्छतेचे आणि
डासांचे माहेरघर आहेत. त्यामुळे महापालिकेने रविवारचा (दि.१७) मुहूर्त
साधून केवळ उंटवाडी पुलाजवळ स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत पुलाजवळील एकाच भागातून तब्बल ४०० किलो कचरा उचलण्यात आला.
उंटवाडीजवळील सिटी सेंटर मॉलच्या भागात ही मोहीम राबवण्यात आली.
मॉलच्या मागील मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नदी पात्रात कचरा टाकला
जातो. विशेषत: भल्या सकाळी किंवा रात्री अशाप्रकारे काही बेजबाबदार
नागरीक या नदीपात्रात कचरा टाकत असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेने याठिकाणी पाळत ठेवून काही नागरिकांना दंडदेखील केला आहे. मुळातच ही नदी बारमाही नसल्याने या पात्रात टाकलेला कचरा जैसे पडून राहतो म्हणजेच प्रवाही होत नाही. त्यामुळे महापालिकेने रविवारी (दि.१७) मोहीम राबविल्याचे घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले. सध्या केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाची तयारी सुरू असून त्या अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. यात दहा ते बारा कर्मचाऱ्यांनी सुमारे ४०० किलो कचरा संकलित केला आहे. नदीपात्र स्वच्छ राहावे यासाठी अशाप्रकारे मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रात कचरा
टाकणाऱ्यांना मोठा दंड करण्यात येणार आहे, असे डॉ. कुटे यांनी सांगितले.
छायाचित्र एनएसकेएडीटवर