शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे सौभाग्याचं लेणं असुरक्षित; सोनसाखळी चोरीचा सिलसिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:38 IST

‘सोनसाखळी चोर पकडा अन् थेट क्राईम ब्रान्चमध्ये पोस्टिंग मिळवा, तसेच ५१ हजाराचे बक्षीसही घ्या’ अशी मेगा आॅफरही पोलीस आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे११ ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओढून पसार झालादोन्ही घटनांमध्ये किमान १२ तासांचे अंतर आहेसोनसाखळी चोरीची दर दिवसाआड एक घटना

नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचा सिलसिला थांबता थांबत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंबड, म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे ६५ हजारांचे सोने लुटल्याचे समोर आले आहे.‘सोनसाखळी चोर पकडा अन् थेट क्राईम ब्रान्चमध्ये पोस्टिंग मिळवा, तसेच ५१ हजाराचे बक्षीसही घ्या’ अशी मेगा आॅफरही पोलीस आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली आहे, तरीही पोलिसांना चोरट्यांना ताब्यात घेण्यास अद्याप यश येत नसल्याचे चित्र आहे. शहर गुन्हे शाखांच्या युनीट-१ व२ तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेला सोनसाखळी चोरांच्या मुसक्या बांधण्यात अलिकडे फारसे यश येऊ शकलेले नाही. सोनसाखळी चोरीची दर दिवसाआड एक तरी घटना शहरात कुठल्या तरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याशिवाय राहत नाही. सर्वाधिक घटना इंदिरानगर, म्हसरूळ, मुंबईनाका, पंचवटी या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच घडल्या आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार सोनसाखळी चोरीच्या घडणाऱ्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.म्हसरूळ शिवारातील स्नेहनगर येथून रस्त्याने पायी जाणाºया महिलेच्या गळ्यातील तीस हजार रु पये किमतीची १०ग्रॅमची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने रात्री नऊ वाजेच्या सुमारास ओरबाडून पळ काढला. याप्रकरणी नितीन वसंत जाधव यांनी तक्र ार दाखल केली आहे .त्यांच्या आई वत्सला व बडोदा येथे राहणाºया मावशी मंगला रामचंद्र खैरनार या दोघी बाहेर खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून त्या घराकडे पायी परतत असताना ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पहिल्या घटनेत अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको पाटीलनगर भागात वर्षा सतीष खैरनार (४०) या मनपा मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळून त्यांच्या मुलीसोबत जात असताना अज्ञात एका दुचाकीस्वार इसमाने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.दुस-या घटनेत सोमवारी (दि.२४) खैरनार पाटीलनगर येथील नव्या मनपा मैदानावर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी प्रवेशद्वाराजवळून त्या जात असताना त्यांच्या समोरून एक अनोळखी इसम काळ्या रंगाच्या दुचाकीवरून भरधाव येत गळ्यावर हात मारून त्यांच्या गळ्यातील सुमारे ३३ हजार रूपये किंमतीची ११ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओढून पसार झाला. या दोन्ही घटनांमध्ये किमान १२ तासांचे अंतर आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरीRobberyचोरी