शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:23 IST

नाशिक : देशातील अग्रगण्य अशा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या विरोधात अकार्यक्षमता आणि मनमानी कारभाराचा ठपका ठेवत १३ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातील चर्चा सुरू होती. दरम्यान, ठरावाची प्रत जिल्हा उपनिबंधकांकडे देखील देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून येथे नेहमीच वादंग राहिला आहे.

नाशिक : देशातील अग्रगण्य अशा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या विरोधात अकार्यक्षमता आणि मनमानी कारभाराचा ठपका ठेवत १३ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातील चर्चा सुरू होती. दरम्यान, ठरावाची प्रत जिल्हा उपनिबंधकांकडे देखील देण्यात आली आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा सदस्यांपैकी १३ संचालकांनी सभापती होळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सभापतिपदी विराजमान असलेल्या होळकर यांच्यावर बाजार समितीमध्ये सुरू असलेला मनमानी कारभार, पोटनियमाविरुद्ध काम करणे, दिलेला शब्द न पाळणे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय न घेणे, संस्थेच्या विरोधात निर्णय घेणे असे गंभीर स्वरूपाचे आरोप करीत १३ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. होळकर यांच्या कारकिर्दीला अडीचवर्ष पूर्ण झाल्यानंतर येथील सभापतिपदा-वरून राजकीय समीकरणे सातत्याने बदलली जात होती. दुसºयांदा सभापती झालेल्या होळकर यांच्याविषयी विद्यमान संचालकांकडून सात्याने मनमानी कारभाराचा आरोप करण्यात येत असल्याने होळकर यांच्याविरोधात कधीही अविश्वास ठराव दाखल होऊ शकतो अशी चर्चा असतांनाच गुरूवारी (दि.८) संचालकांनी जिल्हाधिकारी आणि तसेच जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन अविश्वास ठराव दाखल केला. या ठरावावर संचालक पंढरीनाथ थोरे ,राजेंद्र डोखळे,नानासाहेब पाटील, सुभाष कराड, शिवनाथ जाधव , सौ.प्रिती बोरगुडे,सौ.सुवर्णा जगताप, रमेश पालवे, वैकुंठ पाटील , नंदकुमार डागा, मोतीराम मोगल, सौ.अनिता सोनवणे, भास्करराव पानगव्हाणे यांच्या स्वाक्षरी असल्याचे समजते.देशात अग्रगण्य समजल्या जाणाºया नामवंत अशा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून येथे नेहमीच वादंग राहिला आहे. यापूर्वी देखील सभापतीपदाच्या अडीचवर्षाच्या कार्यकाळाच्या शब्दावरून आमदार छगन भुजबळ यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यावेळी देखील बहुसंख्य संचालकांनी आक्रामक भूमिका घेतली होती. आता होळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने बाजारसमितीचे राजकारण पुन्हा एकदा रंगणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. संचालक पंढरीनाथ थोरे यांनी अविश्वास ठरावासाठी पुढाकार घेतल्याने समजेत.