शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सोशल मीडियातील प्रचाराबाबत अनभिज्ञ

By admin | Updated: January 29, 2017 22:37 IST

नियमावली नाही : चौकशी करणारे इच्छुक माघारी

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्यांवर निवडणूक अधिकाऱ्यांची नजर असून, या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले होते, मात्र यासंदर्भातील नियमावली मागणाऱ्या इच्छुकांना अशाप्रकारची कोणतीच नियमावली नाही, केवळ आयुक्तांचे तोंडी आदेश आहे, असे सांगण्यात आल्याने संबंधितांना माघारी फिरावे लागले, परंतु पालिकेचे कनिष्ठ अधिकारीच याबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले.महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रचार सुरू केला आहे. अनेक इच्छुकांनी आणि नगरेसवकांनी व्हॉट््स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. परंतु महापालिकेची निवडणूक घोषित झाल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोशल मीडियाच्या प्रचारावर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर असल्याचे सांगितले.  तसेच सोशल मीडियावर प्रचारापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार काही इच्छुक उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीशी संंबंधित उपआयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, परवानगी कशी घ्यायची, अर्ज कोठे उपलब्ध आहे, व्हॉट््स अ‍ॅपवर प्रचार करण्यासाठी किती शुल्क भरावे लागेल, फेसबुकसाठी कसा अर्ज करायचा, अशी विचारणा करताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या यासंदर्भातील प्रतीची मागणी केली.  त्यावेळी महापालिकेच्या उपआयुक्तांनी आपल्याकडे अशाप्रकारची कोणतीही प्रत उपलब्ध नसल्याचे सांगितले. इच्छुकांनी त्यावर आयुक्तांनीच पत्रकार परिषदेत याबाबत घोषित केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी आम्हाला केवळ तोंडी आदेश दिले आहे, लिखित पत्रक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे  संबंधित इच्छुक माघारी फिरले. परंतु यातून सोशल मीडियावर  प्रचार कसा करायचा, याबाबत पालिकेचा निवडणूक कक्षच अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)