शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा पाटबंधारे खात्याचे विनास्वाक्षरी स्मरणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:03 IST

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून, या पत्रात पाणी सोडण्यासाठी करावयाच्या सर्व कार्यवाहींची पूर्तता करण्याचा एकीकडे आग्रह धरताना दुसरीकडे मंगळवारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पाणी सोडण्यासाठी दबाव टाकणाऱ्या कार्यकारी संचालकांना मात्र स्मरणपत्रावर स्वत:च्या स्वाक्षरी करण्याचा विसर पडला आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांत दुसरे पत्र : पाणी सोडण्यासाठी दबाव

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरमधून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून, या पत्रात पाणी सोडण्यासाठी करावयाच्या सर्व कार्यवाहींचीपूर्तता करण्याचा एकीकडे आग्रह धरताना दुसरीकडे मंगळवारी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. अवघ्या दोन दिवसांत पाणी सोडण्यासाठी दबाव टाकणाऱ्या कार्यकारी संचालकांना मात्र स्मरणपत्रावर स्वत:च्यास्वाक्षरी करण्याचा विसर पडला आहे.कार्यकारी संचालकांनी नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना या संदर्भात पत्र पाठविले असून, त्यात महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, उच्च न्यायालयातील जनहित याचिका व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने मंगळवारी पाणी सोडण्याबाबत दिलेल्या पत्राचा हवाला देत अद्यापही पाणी सोडण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.कार्यकारी संचालकांच्या या स्मरणपत्रावर मात्र त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याने या पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विनास्वाक्षरी पत्र पाठवून पाणी सोडण्यासाठी कार्यकारी संचालकांनी टाकलेल्या दबावामुळे विभागीय आयुक्त नाराज झाल्याचे सांगण्यात आले. उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्यास शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, शेतकरी व नागरिकांकडून होत असलेला विरोध पाहता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यात यावा तसेच पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर बंधाºयांवरील निडल्स काढून टाकाव्यात अशा प्रकारच्या डझनभर सूचना या पत्रात विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत व येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडावे अन्यथा महाराष्टÑ जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ मधील कलम क्रमांक २६ नुसार कारवाई होऊ शकते याची आठवणही करून दिली आहे.