शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील रस्त्यांवरील  अनधिकृत बांधकामे हटणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:49 IST

सिडकोतील रस्त्यांवर ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनवर उभे राहिलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी लाल खुणा करण्याचे काम सुरू आहे. घरांमधील वाढीव बांधकामांना हात घातलेला नाही. मार्किंगच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत हटविली जाणार असल्याचा पुनरुच्चार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.

नाशिक : सिडकोतील रस्त्यांवर ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनवर उभे राहिलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी लाल खुणा करण्याचे काम सुरू आहे. घरांमधील वाढीव बांधकामांना हात घातलेला नाही. मार्किंगच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत हटविली जाणार असल्याचा पुनरुच्चार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.  गेल्या चार-पाच दिवसांपासून महापालिकेमार्फत सिडकोतील वाढीव बांधकामांवर लाल फुल्या मारण्याचे काम सुरू होते. महापालिकेकडून अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई सुरू होण्याच्या भीतीने नागरिकांकडून या मार्किंगला विरोध करण्यात आला होता, तर विभागीय अधिकाऱ्यांना घेरावही घालण्यात आला होता. सिडकोतील वाढीव बांधकामावरील कारवाईबद्दल नागरिकांमध्ये  घबराट निर्माण होऊन रोष व्यक्त केला जात असतानाच आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी (दि.२४) भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. सदर कारवाई तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना फोन करून कारवाईस स्थगिती देण्याचे आदेशित केल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली होती. त्यामुळे, सिडकोतील नागरिकांना दिलासा लाभला असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कारवाईस स्थगिती आदेश नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिडकोतील ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारीवरूनच रस्त्यावरील ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या लाइनवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मार्किंगचे काम सुरू करण्यात आले होते. केवळ रस्त्यावर अडथळा ठरणाºया बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. घरांमधील बांधकामे हटविली जातील, असे म्हटलेले नाही. वाढीव बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिकांनी ३१ मेपर्यंत कम्पाउंडिंगसाठी प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर नियमानुसार कारवाई होईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.आदेश कुठे तो दाखवा !आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना फोन करून कारवाईस स्थगिती देण्याचे आदेश दिल्याचे म्हटले होते. त्याबाबत आयुक्तांकडे विचारणा केली असता, त्यांनी स्थगिती आदेश कुठे आहे तो दाखवा? असे आव्हान देत त्याबाबत ज्यांनी सांगितले त्यांनाच विचारा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका