शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना वाणिज्य वापरदहा दुकानांना सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:34 IST

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कानडे मारुती लेनमधील विघ्नहर्ता संकुलात विनापरवाना वाणिज्य वापर करणाऱ्या दहा दुकानांना शुक्रवारी (दि. ११) सील ठोकले. सदर संकुलाला लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंगसाठी परवाना देण्यात आलेला होता. परंतु याठिकाणी होलसेल मालाची विक्री करणारी दुकाने थाटण्यात आलेली होती.

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कानडे मारुती लेनमधील विघ्नहर्ता संकुलात विनापरवाना वाणिज्य वापर करणाऱ्या दहा दुकानांना शुक्रवारी (दि. ११) सील ठोकले. सदर संकुलाला लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंगसाठी परवाना देण्यात आलेला होता. परंतु याठिकाणी होलसेल मालाची विक्री करणारी दुकाने थाटण्यात आलेली होती.  महापालिकेच्या पश्चिम विभागातील अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी संबंधित दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली. कानडे मारुती लेनमधील विघ्नहर्ता संकुलातील दहा दुकानांना विनापरवाना वाणिज्य वापर सुरू असल्याप्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाने २९ आॅक्टोबर २०१६ रोजीच अंतिम नोटीस बजावली होती. परंतु, नोटीस देऊनही संबंधितांकडून वाणिज्य वापर सुरूच होता.  पालिकेच्या पथकाने विनापरवाना वाणिज्य वापर करणाºया रवि बॅग हाऊस, साखरिया सोळंकी, रूपाली जनरल स्टोअर्स, जयशंकर ट्रेडर्स, माया जनरल स्टोअर्स, कलश आर्ट तसेच रूपाली नॉव्हेल्टिजचीच तीन दुकाने सील केली. सदर दुकानांमध्ये होजिअरी, प्लॅस्टिक वस्तूंची होलसेल विक्री केली जाते. महापालिकेच्या पथकाने मालासह दुकानांना सील ठोकले. महापालिकेने केलेल्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांची धांदल उडाली. काही व्यावसायिकांनी अटकाव करण्याचाही प्रयत्न केला. परंतु पालिकेने आपली कारवाई पूर्ण केली.फेरीवाल्यांवर अनेक ठिकाणी कारवाईमहापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कानडे मारुती लेन, वकीलवाडी व कॅनडा कॉर्नर परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई केली. कानडे मारुती लेनमधून जवळपास एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले तसेच वकीलवाडी परिसरात तेथीलच व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करत उभारलेले फलकही जप्त करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका