शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अतिक्रमित वस्तीवरील कारवाई बेकायदेशीर

By admin | Updated: September 8, 2015 23:23 IST

मनमाड : दिशा महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

मनमाड : येथील बसस्थानकाशेजारील अतिक्रमित वेश्यावस्ती पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केल्याची कार्यवाही बेकायदेशीर असल्याचा आरोप दिशा महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करून या अन्यायाविरोधात राज्यभरातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त वस्तीमध्येच आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर -पुणे महामार्गावर बसस्थानक परिसरात अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलीस पथकाने चार दिवसांपूर्वी या वस्तीवर धाड टाकून दोन पुरुष व सहा महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील ३२ पीडित महिलांची नाशिकला रवानगी करण्यात आली आहे. सदरची वेश्यावस्ती रिकामी झाल्याने पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने येथील अतिक्रमण जमीनदोस्त केले.सदरची कारवाई करताना रहिवाशांना कुठलीही पूर्वसूचना व नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत तसेच नियम व कायदे धाब्यावर बसवून सदर वस्तीत धाड टाकण्यात आली असल्याचा आरोप स्वास्ती हेल्थ रिसोर्स सेंटरच्या पदाधिकारी सीमा शिंदे, दिशा महिला संघटनेच्या अध्यक्ष परवीन शेख व अन्य पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या महिलांच्या उद्ध्वस्त घरांच्या ढिगाऱ्याखाली गृहोपयोगी सामान तसेच महत्त्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे व दागदागिने, पैसे दाबले गेले आहे. पुढील कार्यवाहीसाठी या महिलांना ओळखपत्राची आवश्यकता असली तरी ते मिळणे मुश्कील झाले आहे. या महिलांना याच वस्तीत घरे बांधून मिळावी, तसेच नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कंपाउंडच्या कामाबाबत स्टे आॅर्डर तसेच अन्यायाविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे सीमा शिंदे यांनी सांिगतले. यावेळी दिशा संस्थेचे रजिया पठाण, लता कापसे, लहू गोमसाळे, संदीप अहिरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)