शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससेवा ताब्यात घेण्यास मनपा असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:27 IST

महापालिकेने शहर बससेवा चालविली पाहिजे, हे खरे असले तरी सद्यस्थितीत एकूणच आर्थिक स्थिती पाहता बससेवा चालविण्यास महापालिका असमर्थ असल्याची स्पष्टोक्ती भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्यवहार्यता तपासून पूर्ण अभ्यासांतीच बससेवेचा निर्णय घेतला जाईल, असे सानप यांनी सांगितले.

नाशिक : महापालिकेने शहर बससेवा चालविली पाहिजे, हे खरे असले तरी सद्यस्थितीत एकूणच आर्थिक स्थिती पाहता बससेवा चालविण्यास महापालिका असमर्थ असल्याची स्पष्टोक्ती भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्यवहार्यता तपासून पूर्ण अभ्यासांतीच बससेवेचा निर्णय घेतला जाईल, असे सानप यांनी सांगितले.महापालिकेने तोट्यात चालणारी शहर बससेवा ताब्यात घ्यावी यासाठी सातत्याने एसटी महामंडळाकडून प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय, गेल्या काही दिवसात बसच्या फेºया अचानक कमी करून महामंडळाने महापालिकेवर दबावही वाढविला आहे. या साºया पार्श्वभूमीवर बससेवेबाबत भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष लागून होते. भाजपाच शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी बससेवेबाबत बोलताना सांगितले, महापालिकेला बससेवा ताब्यात घ्यायची आहे परंतु, सध्या ती वेळ नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती बससेवा चालविण्याइतपत सक्षम नाही. सद्यस्थितीत वीज, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठीही मनपाकडे पुरेसा निधी नाही. शहर बससेवा ताब्यात घेताना संबंधित कर्मचाºयांचे दायित्व महापालिकेला निभवावे लागणार आहे. एकूणच आर्थिक स्थिती पाहता ते शक्य वाटत नाही. त्यामुळे संपूर्ण व्यवहार्यता तपासूनच अभ्यासांती निर्णय घेतला जाईल. घाईघाईने निर्णय घेऊन मनपाचे नुकसान होऊ दिले जाणार नसल्याचेही सानप यांनी स्पष्ट केले.