उमराणे : येथील ग्रामपंचायतीच्या सहा वाॅर्डातील १७ जागांसाठी १२ मार्च रोजी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून दोन्ही पॅनेल प्रमुखांकडून आतापर्यंत केलेल्या विकासकामांसह आगामी काळात करावयाच्या विकासकामांचा वचननामा जाहीर करण्यात आला आहे.या वचननाम्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विकास कामांचा वर्षाव करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी सरपंच पदासाठी लिलाव बोली व रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार याबाबत संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात चर्चिल्या गेलेल्या उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी च्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतानाच दुसरीकडे निवडणूक रिंगणात उतरलेल्या ग्यानदेव दादा देवरे पॅनेल व रामेश्वर ग्रामविकास पॅनेलकडून आतापर्यंत गावात केलेली विकासकामे व आगामी काळात करावयाची विकासकामे यांचा वचननामा जाहीर करण्यात आला आहे. केलेल्या विकासकामांसह आगामी काळात होणार्या विकासकामांबाबत प्रभावीत होऊन गावातील ८९८४ मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतात व कोणत्या पॅनेलला विजयी करतात हे १२ मार्च रोजी मतदानानंतर होणाऱ्या मोतमोजणीत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे नागरिकांची निकालाची प्रतीक्षा वाढली आहे.
उमराणे ग्रामपंचायत; प्रचार अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:19 IST
उमराणे येथील ग्रामपंचायतीच्या सहा वाॅर्डातील १७ जागांसाठी १२ मार्च रोजी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून दोन्ही पॅनेल प्रमुखांकडून आतापर्यंत केलेल्या विकासकामांसह आगामी काळात करावयाच्या विकासकामांचा वचननामा जाहीर करण्यात आला आहे.
उमराणे ग्रामपंचायत; प्रचार अंतिम टप्प्यात
ठळक मुद्देशुक्रवारी फैसला