उमराणे : येथील ग्रामस्थांना अल्पदरात शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत उमराणे व जे. के. वॉटर सोल्युशन इंडस्ट्रीज, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर एटीएम केंद्र सुरु करण्यात आले.अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या उमराणे गावातातील लोकांना अल्पदरात शुद्ध पाणी मिळावे यासाठी सरपंच लता देवरे यांच्या संकल्पनेतुन या वॉटर एटीएम केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. यात ग्राहकांना एक रु पयात एक लिटर पाणी, पाच रु पयांत दहा लिटर तर दहा रु पयांत वीस लिटर पाणी उपलब्ध करु न देण्यात आले आहे.सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाजवळील जलशुध्दीकरण केंद्राजवळ उभारण्यात आलेल्या या वॉटर एटीएम केंद्राचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच लता देवरे, उपसरपंच चिंतामण देवरे, बाळासाहेब देवरे, धनराज देवरे, नंदन देवरे, भगवान देवरे, दिपक देवरे, प्रविण देवरे, रविंद्र जाधव, विजय जाधव, ग्रामसेवक जे. ए. झाल्टे आदिंसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उन्हाळ्याची चाहूल लागली असून उमराणेच्या नागरीकांना अल्पदरात शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी या वॉटर एटीएम केंदाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा ग्रामस्थांना नक्कीच चांगला फायदा होणार आहे.- लता देवरे सरपंच, ग्रामपंचायत, उमराणे.
उमराणेत वॉटर एटीएम केंद्र सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 16:56 IST
उमराणे : येथील ग्रामस्थांना अल्पदरात शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत उमराणे व जे. के. वॉटर सोल्युशन इंडस्ट्रीज, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर एटीएम केंद्र सुरु करण्यात आले.
उमराणेत वॉटर एटीएम केंद्र सुरु
ठळक मुद्देग्रामपंचायतीचा उपक्रम : ग्रामस्थांना अल्पदरात शुद्ध पाणी