शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडून खातेदारांसाठी ‘उमंग’ अ‍ॅप्लिकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:21 IST

भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाची दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पी.एफ. खातेदारांसाठी ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदार घरबसल्या आपले व्यवहार करू शकतील, अशी माहिती भविष्यनिर्वाह निधी आयुक्त एम. एम. अशरफ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सातपूर : भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाची दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पी.एफ. खातेदारांसाठी ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदार घरबसल्या आपले व्यवहार करू शकतील, अशी माहिती भविष्यनिर्वाह निधी आयुक्त एम. एम. अशरफ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.पूर्वी पी.एफ. खातेदारांना आपल्या खात्यावरील रक्कम पाहण्यासाठी अथवा निधी काढण्यासाठी वारंवार भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात तासन्तास ताटकळत थांबावे लागत होते. गर्दीमुळे खातेदारांना सेवा देण्यास कर्मचाºयांना अडचण निर्माण होत होती. त्यात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांतील खातेदारांची परवड होत होती. भविष्यनिर्वाह निधी विभागाने बदल करीत पारदर्शक कारभारावर जोर दिला आहे. काही दिवसांपूर्वी खातेदारांसाठी एक पोर्टल तयार करण्यात आले होते. आता ‘उमंग’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनमुळे खातेदारांना आपल्या मोबाइलवर खात्यातील शिल्लक रक्कम, एकूण जमा रक्कम आदी बाबी नियमित पाहता येतील. शिवाय खात्यातून काही रक्कम काढायची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही. या अ‍ॅप्लिकेशनमुळे खातेदारांची गैरसोय होणार नाही, असा दावा या कार्यालयाने केला आहे.आजकाल सर्वांकडे अँड्रॉइड मोबाइल फोन असल्याने प्ले स्टोअरमधून ‘उमंग’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे लागेल. तत्पूर्वी केवायसी करणे आवश्यक आहे. त्यात जन्मदिनांक, लिंग आणि नाव आवश्यक आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून पी.एफ. खातेदार आपले सर्व व्यवहार घरबसल्या करू शकतो. काही अडचणी आल्यास (उदा. नाव बदल, जन्मदिनांक) पी. एफ. कार्यालयात अर्ज करून योग्य त्या दुरु स्त्या करण्यास सहकार्य केले जाईल.