शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

उमेदवारीसाठी इच्छुक कुंपणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:21 IST

घमासान : नेत्यांना करावी लागणार कसरत

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनल आणि समाज विकास पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे असून, दोन्ही बाजूने उमेदवारी मिळण्यावरून घमासान निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात प्रगती पॅनलकडून उमेदवारी न मिळाल्यास अनेक मातब्बरांनी समाज विकास पॅनलकडून उमेदवारी करण्याची तयारी केली आहे.सत्ताधारी गटाने पॅनलचे नामकरण प्रगती केले असून, गुरुवारी (दि.२७) विरोधी गटाने पॅनलचे नामकरण समाज विकास ठेवले. दोन्ही पॅनलने त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा माघारीच्या अंतिम दिवशी ३ आॅगस्टला करण्याचे जाहीर केले आहे. निफाडमध्ये आमदार अनिल कदम व माजी आमदार दिलीप बनकर यांच्याबरोबरच जिल्हा बॅँकेचे माजी संचालक माणिकराव बोरस्ते हे प्रगती पॅनलसाठी एकत्र आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आमदार अनिल कदम यांनी सत्ताधारी पॅनल विरोधात चूल मांडण्यासाठी मेळावा घेतल्याची चर्चा होती. गुरुवारी (दि.२७) प्रगती पॅनलच्या व्यासपीठावरून त्यांनी नीलिमा पवार यांची स्तुती करीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही आजी-माजी आमदारांचे समर्थक या निर्णयाने त्यांच्यासोबत कितपत राहतात, हा चर्चेचा विषय होता, तर काही माजी आमदारांनी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींनी पॅनलमध्ये वर्णी लागते की नाही, याची वाट पाहत ऐनवेळी उमेदवारी कापली जाण्याची शक्यता गृहीत धरून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तिकडे गुरुवारी प्रगती पॅनलच्या व्यासपीठावर असलेल्या माजी अध्यक्ष अरविंद कोर यांनीही आपल्याला कोणी गृहीत धरू नये, असा इशारा दिल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. वक्तव्य जिव्हारी लागलेभाजपाचे नेते व आजी-माजी लोकप्रतिनिधी समाज विकास पॅनलच्या मदतीला धावत असतानाच शिक्षक परिषदेच्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी करणारे भाजपाचे नेते डॉ. प्रशांत पाटील हे प्रगती पॅनलच्या व्यासपीठावर अवतरल्याने तोही एक चर्चेचा विषय होता. प्रगती व समाज विकास पॅनलच्या नेत्यांनी अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातच प्रगती पॅनलच्या भाषणात ‘ही राजकारणाची जागा नव्हे’ असे वक्तव्य पॅनलच्याच काही नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जाते. आजी-माजी लोकप्रतिनिधींना एकप्रकारे समाजाच्या संस्थेतून बाहेर जाण्याचाच हा इशारा असल्याचे या आजी-माजी लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही पॅनलकडून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडण्याची चिन्हे आहेत.