शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट््सला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:18 IST

सन २०१३ पासून वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्््स बसविण्याबाबतची चर्चा होत असताना आता या नंबर प्लेट््सला मुहूर्त लागला आहे. राज्यात १ एप्रिलपासून नव्या आणि जुन्या वाहनांनाही अशा प्रकारच्या सुरक्षित नंबर प्लेट््स बंधनकारक करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या मोटार वाहन नियमानुसार अशा प्रकारच्या नंबरप्लेट््स वाहनांना लागणार आहेत.

ठळक मुद्देएप्रिलमध्ये अंमलबजावणी : जुन्या वाहनांनाही सक्ती;कंपनीकडूनच मिळणार नव्या वाहनांना नंबरप्लेट्स

नाशिक : सन २०१३ पासून वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्््स बसविण्याबाबतची चर्चा होत असताना आता या नंबर प्लेट््सला मुहूर्त लागला आहे. राज्यात १ एप्रिलपासून नव्या आणि जुन्या वाहनांनाही अशा प्रकारच्या सुरक्षित नंबर प्लेट््स बंधनकारक करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या मोटार वाहन नियमानुसार अशा प्रकारच्या नंबरप्लेट््स वाहनांना लागणार आहेत.वाहनांच्या सुरक्षिततेच्या कारणावरून वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट विहित नमुन्यात बदलविण्याची तरतूद असून, आता या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचे पत्र नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त झाले आहे. केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९च्या नियम ५० नुसार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट असावी, असा नियम आहे. वाहनांची चोरी आणि त्यातून घडणाऱ्या घातपाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या नंबरप्लेट््स महत्त्वाच्या ठरणार असल्याने या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.नव्या वाहनांना संबंधित वाहन उत्पादन कंपनीच अशा प्रकारची नंबरप्लेट देणार आहे. किंबहूना तसे संबंधिताना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जुन्या वाहनांनादेखील हाच नियम असून, त्यांच्यासाठी डिलर आणि पुरवठादार नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. प्रारंभी आरटीओ कार्यालयाकडूनच अशा प्रकारच्या हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय झाला होता. अशा प्रकारच्या नंबरप्लेट काही दलालांकडेदेखील आढळून आल्यानंतर ही योजना काहीकाळ सुरक्षिततेच्या कारणास्तव गुंडाळण्यात आली होती. आता हीच योजना अधिक सुरक्षिततेने सज्ज असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.कायमस्वरूपी नंबरप्लेटकेंद्रीय मोटारवाहन विभागाकडून अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत. सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात आल्यामुळे वाहनावर एकदा अशा प्रकारची हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावली तर ती कायमस्वरूपी राहणार आहे. ती काढता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर प्लेट वॉटरप्रुफ आणि अ‍ॅल्युमिनियमच्या साहायाने बनविण्यात आलेली असेल. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाचे चक्राकार होलोग्राम असणार आहे. तसेच ‘इंडिया’ही अक्षरेही असणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारRto officeआरटीओ ऑफीस