शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पदवी वाचविण्यासाठी ‘मुक्त’चे यूजीसीत अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:26 IST

केंद्रीय विद्यापीठ आयोगाद्वारे मुक्त विद्यापीठांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना केल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी पदवी अभ्यासक्रमही अडचणीत आला

नाशिक : केंद्रीय विद्यापीठ आयोगाद्वारे मुक्त विद्यापीठांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना केल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी पदवी अभ्यासक्रमही अडचणीत आला असून, पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना यूजीसीने केली आहे. परंतु, यूजीसीने केलेली ही सूचना निराधार असून, मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी राज्य सरकारकडून कायदेशीर तरतूद करून विद्यापीठात कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाला कायदेशीर आधार असून यूजीसीने केलेल्या सूचनेच्या विरोधात मुक्त विद्यापीठातर्फे अपील करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतल्याची माहिती कुलगुरू ई. वायुनंदन यांनी मंगळवारी (दि.१६) ‘लोकमत’शी बोलताना दिली.दूरस्थ शिक्षण प्रणालीतून कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळत असल्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची या अभ्यासक्रमामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे़ परंतु गेल्या आठवड्यापूर्वीच दूरस्थ शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांनी कृषी अभ्यासक्रम बंद करावे, अशा सूचना करणारे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला असून, कृषी प्रशिक्षण देणा-या  या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाला एक वेगळी ओळख मिळाली असून समाजालाही त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, अशा कृषी अभ्यासक्रमांना बंद करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र मुक्त विद्यापीठ राज्याच्या नियमानुसार चालणारे आहे. विद्यापीठात निर्मिती करतानाच राज्यातील कृषी क्षेत्राचा विचार करून कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठ कृषी अभ्यासक्रम कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही. त्यासाठी आज युजीसीकडे अपील करीत आहोत.- प्रा. ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

टॅग्स :Yashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठagricultureशेती