शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार निवडणुकीची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:54 IST

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन पक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले असले तरी, सहाणे यांची पक्षाने केलेली हकालपट्टी व स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत खांदेपालटामुळे व्यक्त होणारी खदखद अद्यापही शमलेली नाही.

ठळक मुद्देनिवडणूक तयारी : उत्तर महाराष्टÑाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

नाशिक : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी रविवारी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीतीसाठी उत्तर महाराष्टÑातील प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन पक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले असले तरी, सहाणे यांची पक्षाने केलेली हकालपट्टी व स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत खांदेपालटामुळे व्यक्त होणारी खदखद अद्यापही शमलेली नाही. आठवडाभरापूर्वी नाशिकमध्ये उत्तर महाराष्टÑाचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी भेट घेऊन पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नगरसेवकांच्या बोलविलेल्या बैठकीकडे बहुतांशी पदाधिकारी, नगरसेवकांनी पाठ फिरविल्याची बाब त्याचेच द्योतक असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीसाठी नगरसेवकांना बोलविलेच नसल्याची सारवासारव नंतर करण्यात आली असली तरी, या बैठकीला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहूनच खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना ‘मातोश्री’वर पाचारण करावे लागले, हेदेखील नाकारून चालणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना फारसे अनुकूल वातावरण दिसत नसल्याची भावना पक्ष कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, भाऊ चौधरी हे रविवारी नाशकात येत असून, दिवसभर वेगवेगळ्या पातळीवर पक्षाच्या पदाधिकाºयांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाºयांची बैठक जिल्हानिहाय घेण्यात येणार आहे त्यानंतर साडेबारा वाजता जिल्ह्यातील सर्व नगरसेवकांची बैठक होईल व त्यानंतर दुपारी तीन वाजता सर्व जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व महिला आघाडीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत विधान परिषदेतील दगाफटका टाळण्यासाठी पदाधिकाºयांना जबाबदारीचे वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीतच बहुधा लोकसभेसाठी संभाव्य उमेदवाराच्या नावाची चचापणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय नरेंद्र दराडे यांच्या प्रचाराला प्रतिसाद न देणाºयांचा समाचार घेतला जाण्याचीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक