शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

उदासिन नगरसेवक, बैठकीचा खोळंबा पूर्व प्रभाग: गणसंख्येअभावी ताटकळले अधिकारी

By admin | Updated: May 30, 2014 01:06 IST

इंदिरा नगर- नागरी कामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक नेहमीच करीत असतात. परंतु अनेक नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकींनाच उपस्थित राहात नसल्यामुळे सभा तहकुब करण्याची वेळ येते. पूर्व प्रभाग समिती आज अशीच वेळ आल्याने अन्य उपस्थित नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित नगरसेवक इतकेच उदासिन असतील तर प्रभाग समितीच्या सभाच बंद करण्याची मागणीही करण्यात आली.

इंदिरा नगर- नागरी कामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक नेहमीच करीत असतात. परंतु अनेक नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकींनाच उपस्थित राहात नसल्यामुळे सभा तहकुब करण्याची वेळ येते. पूर्व प्रभाग समिती आज अशीच वेळ आल्याने अन्य उपस्थित नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित नगरसेवक इतकेच उदासिन असतील तर प्रभाग समितीच्या सभाच बंद करण्याची मागणीही करण्यात आली.पूर्व प्रभाग समितीची सभा गुरूवारी सभापती कुणाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा प्रकार घडला. सकाळी साडे अकरा वाजता सभा होणार असल्याने महापालिकेचे विविध खात्यांचे अधिकारी वेळेत हजर होते. परंतु सदस्य पुरेशा संख्येने हजर नव्हते. गणसंख्या पूर्ती अभावी सभापतींना सभाच सुरू करता येत नसल्याने बैठकच सुरू झाली नाही अखेरीस उपस्थित काही नगरसेवकांनी गुलजार कोकणी आणि रंजना पवार यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला आणि बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली. तब्बल एक तासाने गणसंख्या पूर्ण झाली आणि मग सभेचे कामकाज सुरू झाले. तो पर्यंत दिवगंतांना श्रध्दांजली अर्पण करून सभा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.प्रत्येक प्रभाग समिती बैठकीच्या वेळी गणसंख्या पूर्ण करण्यासाठी अनुपस्थित नगरसेवकांना भ्रमणध्वनी करावा लागतो. त्यानंतर सदस्य अर्धा एक तासाने येतात, जर नगरसेवकांनाच आपल्या प्रभागातील कामांची आस्था नसेल तर प्रभाग सभाच बंद करा, अशी मागणी संजय साबळे यांनी केली. दरम्यान, भद्रकालीसह विविध भागात एका खासगी कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेले खोदकाम त्यामुळे होणारे अपघात, झाकीर हुसेन रूग्णालयात रोगनिदान सामग्री नसल्याने होत असलेली गैरसोय याबाबत साबळे यांनी तक्रार केली. तर दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटी परीसरात लेखंडी जाहिरातीचे फलक वीज तारांवर पडले. दुर्घटना टळली असली तरी अशा प्रकारचे फलक हटविण्याची मागणी यशवंत निकुळे यांनी केली. तर पाण्याची गळती थांबविणार्‍या कनिष्ठ अभियंता पाटोळे यांचा सत्कार संदीप लेनकर यांनी केला. यावेळी रंजना पवार, रशिदा शेख, निलीमा आमले, अर्चना थोरात आदी उपस्थित होते.