शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टाईपरायटरची टक टक झाली शांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 17:22 IST

इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाईपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकिय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परिक्षा संगणकावरुनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाईपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकिय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परिक्षा संगणकावरुनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टाईपरायटरच्या ‘टक-टक’ला पुर्णविराम मिळाला.राज्यातील शासकिय व निमशासकिय कार्यालयांमध्ये लिपिक, टंकलेखक पदावरील नियुक्तीसाठी राज्य परीक्षा परिषदेची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. टाईपरायटर कालबाह्य होणे सहाजिकच होते. त्यामुळे शिक्षण विभागानेही आता यापुढे टंकलेखनाची परीक्षा संगणकावर घेतल्या जाऊन आधुनिक युगाबरोबर चालण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला आहे. २०१३सालीच शासनाने टंकलेखनाची परीक्षा संगणकामार्फत घेण्याचा विचार केला होता; मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल चार वर्षे लोटली. चालू वर्षापासून मात्र टंकलेखनाची परीक्षा संगणकावरुन कायमस्वरुपी घेतली जाणार आहे. १८आॅगस्टपासून टंकलेखनाच्या संगणकीकृत परीक्षेला प्रारंभ होत आहे. टाईपरायटरवरील अखेरची परीक्षा सात आॅगस्टपासून सुरू होती. त्याचा शेवट शनिवारी झाला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमधील टंकलेखनाच्या संगणकावरील अभ्यासक्रमामध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. टंकलेखनाची वेगमर्यादाही तेवढीच ठेवण्यात आली आहे.एकूणच संगणकाचे प्रस्थ पुर्णपणे निर्माण होईपर्यंत आपले अस्तित्व टिकविणाºया टाईपरायटरची आता मात्र एक्झिट’ झाल्याने टायपिंग इन्स्टिट्यिूटमध्येही टंकलेखनाचे धडे संगणकावरच दिले जाणार आहे. त्यामुळे संगणकीकृत टायपिंग इन्स्टिट्यूट असे नामकरण होण्याची यापुढे शक्यता आहे. काळानुरूप या बदलाचा स्विकार करणे स्वभाविक आहे. त्यामुळे बहुतांश इन्स्टिट्यूटमध्येही टाईपरायटर यंत्र हे एक संग्रही म्हणून बघावयास मिळणार आहे.