शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दारणा नदीपात्रात दोन तरुण बुडाले; अग्निशमन दल, पोलिसांकडून बचावकार्य सुरू

By नामदेव भोर | Updated: June 11, 2023 15:58 IST

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे व अग्नीशमनदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शनिवारी  सायंकाळपासून या भागात मदत कार्य सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : दारणा नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली असून या तरुणांचा अग्नीशमन दलाचे जवान आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यातील पथकांकडून जीवरक्षकांच्या मदतीने शोध सुरू आहे. 

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, चेहडी पंपींग बंधाऱ्याजवळ शनिवारी (दि.१०) दुपारी दोन वाजेच्या  सुरारास सिन्नरफाटा येथील सिद्धार्थ संकेत गांगुर्डे (१७), राहूल दिपक महानुभाव (१८), संतोष नामदेव मुकणे, व आर्यन नंदू जगताप हे चौघे तरुण पोहण्यासाठी गेले होते. यातील दोन तरुण पाण्याच्या उलट्या प्रवाहात अडल्याने त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. मात्र त्यांचा प्रवाहातून बाहेर पडेपर्यंत दम संपल्याने ते दोघे बुडाल्याचे त्यांच्या साथिदारांनी पोलिसांना सांगितले.  पाण्यात बुडालेल्या तरुणांमध्ये सिद्धार्थ संकेत गांगुर्डे (१७), राहूल दिपक महानुभाव (१८) या दोघांचा समावेश असल्याचे  संतोष नामदेव मुकणे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली, मात्र पोलिसांनी अद्याप कोणत्याही माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे व अग्नीशमनदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शनिवारी  सायंकाळपासून या भागात मदत कार्य सुरू आहे, परंतु, दारणा धरणातून आवर्तन सुरू असल्याने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात रविवारी सायंकाळपर्यंत बचावकार्य करणाऱ्या पथकाच्या हाताला काहीच लागलेला नाही. त्यामुळे उशीरापर्यंत बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे