शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
2
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
3
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
4
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
5
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
8
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
9
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
10
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
11
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
12
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

गंगापूर धरणात दोघे युवक बुडाले

By admin | Updated: April 20, 2017 01:01 IST

नाशिक : येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरुण बुडाल्याची घटना संध्याकाळी घडली.

 नाशिक : येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरुण बुडाल्याची घटना संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. एका तरुणाचा मृतदेह जलाशयामधून काढण्यात यश आले. तर दुसरा तरुण अद्याप बेपत्ता आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका वाइन फॅक्टरीमध्ये डेकोरेशन करण्यासाठी सहा तरुण शहरातून आले होते. काम आटोपल्यानंतर संध्याकाळी गंगापूर धरणावरील सूर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी हे सर्व मित्र जवळच्या सावरखेड गावालगत असलेल्या बॅक वॉटरवर पोहोचले. यावेळी इश्तियाक मुस्ताक शेख (१९, रा. लेखानगर), अभिनव सेन (२०, रा. इंदिरानगर) यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही व हे दोघे पाण्यात उतरले. दरम्यान, पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी दोघेही पाण्यात बुडाल्याचे बघून त्यांच्या मित्रांनी पोलीस मुख्यालयासह, अग्निशमन मुख्यालयाला सदर बाब तातडीने कळविली. सातपूर उपकेंद्राचा बंब व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, राजेंद्र वाघ, सुभाष देवरे, मधुकर आथरे, महेमुद पटेल यांचे गस्त पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी सावरगाव ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांच्या मदतीने शोधकार्याला प्रारंभ केला. शेखचा मृतदेह बाहेर काढण्यास त्यांना यश आले. मयत शेखच्या पश्चात आई, वडील, दोन लहान भाऊ, बहीण, दाजी असा परिवार आहे. शेख हा घरात कमविणारा होता, कारण वडील दृष्टिबाधित असल्यामुळे त्याच्यावर आणि आईच्या मोलमजुरीवर उदरनिर्वाह अवलंबून होता. मंडप डेकोरेशनचे काम करून शेख कुटुंबाला हातभार लावत होता. (प्रतिनिधी)