शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पेठ रस्त्यावर अपघातात दोन महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2015 22:48 IST

दिंडोरी : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात स्कार्पिओ दरीत कोसळली

 दिंडोरी : नाशिक-पेठ-धरमपूर रस्त्यावर रासेगाव शिवारातील एका अपघातप्रवण जागेजवळ दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओला झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या असून वाहनचालकासह तीन महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त झाल्याल्या स्कॉर्पिओमधून काही भाविक गुजरातमधील चिन धर्म स्थळास भेट देवून परतत होते. नाशिक-पेठ-धरमपूर रस्त्यावर रविवारी दुपारी एका दुचाकीला वाचिवण्याच्या नादात गुजरातमधील चिन धर्म स्थळास भेट देवून नाशिकला परतणाऱ्या भाविकांच्या स्कोर्पिओ गाडीला अपघात होत झाला. या वेळी गाडी पलटी झाल्याने या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. तर पाच जण जखमी झाले आहे . सातपूर येथील एम एच १५ इ एक्स ५५१५ स्कॉर्पिओ गुजरातहून नाशिककडे भरघाव वेगात येत असताना पेठ रस्त्यावर रासेगाव शिवारात ही घटना घडली. समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचिवण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ सुमारे चारशे फुट खोल कोसळल्याने गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवासी चंदाबाई ओमकार थोरात (४६) व त्रिमूर्ती चौक येथील अनिता संजय पाडवी (४०) या दोन महिला जागीच ठार झाल्या . तर सातपूरचा रहिवासी पप्पू पशुपतीनाथ पांडे (३५) पाथर्डी येथील अनुराधा राजू साळुंखे (४२), आशा प्रकाश अहिरे (३५) रा. सातपूर, ख्रिस्तिना प्रमोद भोसले रा. इंदिरानगर या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. जे .शेख हवालदार कदम, खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना गाडी बाहेर काढत नाशिक येथे उपचारासाठी पाठवले असून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

रस्त्याचे रु ंदीकरण, नुतनीकरण करण्याची मागणी

या अपघातस्थळी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून येथे गतिरोधक बसवावे तसेच या रस्त्याचे रु ंदीकरण व नुतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने चालकाकडून खड्डे चुकविण्याच्या नादात सातत्याने अपघातात वाढ होत असून राष्ट्रीय महामार्ग घोषित होवूनही रस्त्याची दुर्दशा थांबलेली नाही. सिहंस्थाच्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी एका दुचाकीला वाचिवण्याच्या नादात संट्रो, आयशर व दुचाकीत अपघात झाल्याने तीन भाविक ठार झाले होते.