शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

दुचाकीस्वारांनी पादचाऱ्याचा मोबाइल खेचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:43 IST

रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा महागडा मोबाइल दुचाकीवरील दोघा संशयितांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़

नाशिक : रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा महागडा मोबाइल दुचाकीवरील दोघा संशयितांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़  गंगापूररोडवरील पूर्णवादनगर येथील रहिवासी सुशांत सुनील पाटील हे रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास सावरकरनगर येथील राठी बंगल्यासमोरून पायी जात होते. यावेळी पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी पाटील यांच्या हातातील ७५ हजार रुपयांचा अ‍ॅपल आयफोन एक्सटी हिसकावून फरार झाले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शेडच्या वादातून एकास मारहाणशेड बांधण्याच्या वादातून एकास जबर मारहाण केल्याची घटना औरंगाबाद रोडवरील माडसांगवीजवळ असलेल्या मानूर येथे शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी घडली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित संतोष जिवा मिरके (२९, रा. मानूर गाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानूर येथील मच्छिंद्र पवार यांची गावात सर्व्हे नंबर १७९ च्या शेजारी जागा आहे. या जागेवर संशयित मिरके याने शेड बांधण्यास सुरुवात केल्याने त्यास पवार यांनी प्रतिबंध केला़ याचा राग येऊन मिरके याने लोखंडी गजाने पवार यांना जबर मारहाण केली़दुचाकीवरून उतरताना पडलेल्या वृद्धाचा मृत्यूदुचाकीवरून उतरताना तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना द्वारका परिसरातील चेतना हॉस्पिटलसमोर घडली़ बाजीराव भीमराव महाजन (६७, रा. मंगलमूर्ती अपार्टमेंट, द्वारका) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाजन हे बुधवारी (दि़२७) द्वारका येथील चेतना हॉस्पिटलसमोर दुचाकीवरून खाली उतरत असताना तोल जाऊन डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना तत्काळ पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या अपघाताची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़गोमांस बाळगणाºया दुचाकीस्वारास अटकदुचाकीवरून गोमांसाची वाहतूक करणाºया संशयितास वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (दि़२९) द्वारका सर्कलवर अटक केली़ कुरेशी अझरुद्दीन मोहंमद सलिम (३०, चौक मंडई, भद्रकाली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दुपारच्या सुमारास संशयित कुरेशी हा अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून (एमएच १५, ईझेड ६७४३) बेकायदेशीररीत्या कत्तल केलेले गोमांस चोरट्यारीतीने विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय